🔥हेच ते ठाणेदार निलेश सुरवडकर गुन्हेगारांचे ‘रक्षक’ पाॅस्को चा गंभीर गुन्हा दडपण्याचा प्रयत्न १,००,००० रुपयांचे ‘मित्रप्रेम’ अन् खाकीचा भीषण कलंक!🔥हाच तो पास्को चा आरोपी भाजपा चा नेता व उद्योजक
🔥अल्पवयीन पीडिताच्या गुप्तांगाला स्पर्श, अपहरणाचा प्रयत्न तरीही ‘दत्ता शेगर’ मोकाट!
🔥एसपींच्या आदेशानंतरच गुन्हा दाखल, पण आरोपीला अभय; ठाणेदार निलेश सुरवडकर यांच्या निलंबनाची मागणी पेटली!
यवतमाळ -/ संवेदनशील समजल्या जाणाऱ्या यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात खाकी वर्दीला काळीमा फासणारा अत्यंत संतापजनक आणि चीड आणणारा प्रकार समोर आला आहे. एका १४ वर्षांच्या अल्पवयीन अनाथ-गरीब मुलावर झालेल्या लैंगिक अत्याचार आणि अपहरण प्रयत्नाचा गंभीर गुन्हा दडपण्यासाठी ठाणेदार निलेश सुरवडकर यांनी चक्क ‘आर्णी’चे मित्रप्रेम आणि अर्थपूर्ण देवाणघेवाणीचा ‘जुगाड’ चालवल्याचा खळबळजनक आरोप होत आहे. पोलीस अधीक्षकांच्या थेट हस्तक्षेपानंतर गुन्हा तर दाखल झाला, पण स्वयंघोषित युवा उद्योजक आरोपी दत्ता शेगर याला अटक करण्याचे साधे धाडस ठाणेदारांनी दाखवलेले नाही. त्यामुळे “ठाणेदार निलेश सुरवडकर हे गुन्हेगारांचे रक्षक आहेत की कायद्याचे?” असा जळजळता सवाल आता यवतमाळकर विचारत आहेत. घटनेची पार्श्वभूमी अत्यंत भीषण आणि काळीज पिळवटून टाकणारी आहे. भोसा रोड, प्रभात नगर येथील रहिवासी व विवेकानंद विद्यालयात १० वीत शिकणारा १४ वर्षीय विद्यार्थी २३ जून रोजी दारव्हा रोडवरील कोल्हे सभागृहाजवळून जात होता. गर्दीत अनावधानाने त्याचा धक्का एका अनोळखी इसमाला लागला. एवढ्याशा कारणावरून नराधमाने मुलाला अन् त्याच्या मृत वडिलांबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अर्वाच्च शिवीगाळ केली आणि पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा गाडीत (MH-29-CR-4141) बसून पसार झाला. मात्र, या विकृत मनोवृत्तीच्या चालकाची मुजोरी एवढ्यावरच थांबली नाही. ९ जुलै आणि १७ जुलै रोजी अलअमीन ले-आऊट व लखन धाबा परिसरात त्याने पुन्हा या मुलाचा पाठलाग केला. मुलाला अडवून शिवीगाळ करत चालकाने त्याची कॉलर पकडली अन् जबरदस्तीने गाडीत ओढण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान नराधमाने मुलाच्या गुप्तांगाला घट्ट पकडून अत्यंत अश्लील अन् वेदनादायक स्पर्श केला. मुलगा घाबरून ओरडू लागल्यावर त्याने गाडीतील ‘नितीश’ नावाच्या साथीदाराला “याला बळजबरीने गाडीत टाक!” असा हुकूम दिला. मात्र, पीडित मुलाने प्राणाची पराकाष्ठा करत आरोपीच्या हाताला जोराचा झटका दिला आणि तिथून पळ काढल्याने पुढील भयंकर अनर्थ टळला. वडिलांचे छत्र हरपलेला हा मुलगा आणि त्याची मजुरी करणारी आई या घटनेने पुरते हादरून गेले. अत्यंत भीतीपोटी त्यांनी कौटुंबिक सोबती सोहनसिंह सोलंकी यांच्यासह यवतमाळ शहर पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. मात्र, ज्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा होती, त्या ठाणेदार निलेश सुरवडकर यांनी कायदा बाजूला ठेवून गुन्हेगारांची ढाल बनणे पसंत केले! दोन दिवस तक्रारदाराला ताटकळत ठेवून गुन्हा दाखल करण्यास स्पष्ट टाळाटाळ करण्यात आली.
अखेर पीडित कुटुंबाने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षकांनी तत्काळ कडक आदेश दिल्यानंतर कुठे यवतमाळ शहर पोलिसांची झोप उडाली! पोलीस ठाण्यात इनोव्हा चालक व साथीदाराविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३५२, ३५१(२)(३) सह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (POSCO – कलम ८) अंतर्गत गुन्हा तर नोंदवण्यात आला, पण ही केवळ कागदी कारवाई ठरली. यवतमाळ शहर पोलीस स्टेशनची धुरा सांभाळल्यापासून ठाणेदार निलेश सुरवडकर केवळ गुन्हे ‘बार्किंग’ (दडपणे व तडजोडी करणे) करून स्वतःचे खिसे भरण्यात मग्न असल्याचा थेट आरोप नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. या प्रकरणात तर इनोव्हा गाडी ज्याच्या नावावर आहे, तो स्वयंघोषित ‘युवा उद्योजक’ आरोपी दत्ता शेगर याला वाचवण्यासाठी आर्णी येथील जुन्या ‘मित्रप्रेमा’ची ढाल पुढे करण्यात आली. रोख रकमांचा व्यवहार करून केवळ नाममात्र गुन्हा दाखल केला गेला अन् आरोपींना खुलेआम फिरण्याची मुभा देण्यात आली!
गंभीर बाब म्हणजे, आरोपीला पकडल्यानंतर कायद्यानुसार होणारी ‘ओळख परेड’ सुद्धा पीडित मुलाकडून करून घेण्यात आलेली नाही. यावरून ठाणेदार निलेश सुरवडकर हे आरोपींना वाचवण्यासाठी कोणत्या थराला गेले आहेत, हे स्पष्ट होते.
”पोक्सो सारखा अजामीनपात्र अन् मानवतेला काळिमा फासणारा गुन्हा दडपण्याचे धाडस करणाऱ्या ठाणेदारावर अद्याप शिस्तभंगाची किंवा निलंबनाची कारवाई का करण्यात आली नाही? पोलीस प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करत आहे?”
— असा संतप्त सवाल आता वकील अन् सामाजिक संघटना विचारत आहेत.आरोपीला तात्काळ बेड्या ठोकून ठाणेदारावर कारवाई करा; अन्यथा ‘यवतमाळ बंद’चा इशारा!
पोलीस स्टेशनमध्येच जर गुन्हेगारांचे पोषण होणार असेल, तर सामान्य जनतेने न्याय मागायचा कोणाकडे? एका बापाचे छत्र नसलेल्या १४ वर्षांच्या अनाथ बालकाला न्याय मिळवून देण्यासाठी आता शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि वकील आक्रमक झाले आहेत.
जर इनोव्हा चालक, दत्ता शेगर आणि त्याच्या साथीदाराला तात्काळ अटक करण्यात आली नाही आणि गुन्हा दडपणाऱ्या ठाणेदार निलेश सुरवडकर यांच्यावर तात्काळ शिस्तभंगाची व निलंबनाची कारवाई झाली नाही, तर यवतमाळ शहर पोलीस ठाण्यावर तीव्र मोर्चा काढत संपूर्ण शहर बंद पाडू अन् जनआंदोलन छेडू, असा स्पष्ट आणि थेट इशारा देण्यात आला आहे. या प्रकरणामुळे आता यवतमाळ पोलीस प्रशासनाचे धाबे दणाणले असून पोलीस अधीक्षक या भ्रष्ट ठाणेदारावर काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे!(क्रमशः)