तान्ह्या पोळ्याला कौटुंबिक वादातून रक्तरंजित थरार; मुलाकडून बापाची निर्घृण हत्या 

0

🔥तान्ह्या पोळ्याला कौटुंबिक वादातून रक्तरंजित थरार; मुलाकडून बापाची निर्घृण हत्या.

वर्धा -/ तान्ह्या पोळ्याचा सण जिल्ह्यात उत्साहात साजरा होत असतानाच विरुळ आकाजी येथे घडलेल्या धक्कादायक घटनेने या आनंदोत्सवाला गालबोट लागले. कौटुंबिक वादातून मुलाने वडिलांवर केलेल्या मारहाणीत वडिलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी ११ ते १२ वाजताच्या सुमारास घडली.

                परमेश्वर चौधरी असे मृतक वडिलांचे नाव असून, प्रणय चौधरी याला याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, परमेश्वर चौधरी व त्यांचा मुलगा प्रणय चौधरी यांच्यात शुक्रवारी सकाळी कौटुंबिक कारणातून वाद निर्माण झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी झालेल्या मारहाणीत परमेश्वर चौधरी गंभीर जखमी झाले. त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.                   घटनेनंतर मृतदेह घराबाहेर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आल्याने परिसरात खळबळ उडाली. माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पुलगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी वंदना कारखेले, ठाणेदार ढाकणे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पुलगाव येथील रुग्णालयात पाठविला.

                या घटनेमागील नेमके कारण काय, वडील-मुलामध्ये वाद कशामुळे झाला आणि हत्या नेमकी कशा प्रकारे करण्यात आली, याचा तपास पुलगाव पोलीस करीत आहेत. दरम्यान, संशयित मुलगा प्रणय चौधरी याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशीत घटनेचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

           ब्युरो रिपोर्ट साहसिक      News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!