ग्रामसेविकेच्या तोतया न्यायाधिश पतीला अटक करण्याचे पोलीसां समोर आव्हान,बेरोजगारांची फसवणुक करुन ग्रामसेविका,तोतया न्यायधिश पतीसह फुर्र्

0

🔥हेच ते ग्रामसेविकेच्या तोतया न्यायाधिश पतीला अटक करण्याचे पोलीसां समोर आव्हान,बेरोजगारांची फसवणुक करुन ग्रामसेविका,तोतया न्यायधिश पतीसह फुर्र्

(यवतमाळ प्रतिनिधी)-/ बहुचर्चीत ग्रामसेविका आरती वडुले सह तोतया न्यायाधिश पती मारुती मुलुक विरोधात वडकी पोलीसात गुन्हे दाखल झाल्या पासुन ते दोघेही फरार आहे.त्यांना शोधून अटक करणे पोलीसा समोर मोठे आव्हान आहे.राळेगाव पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या आष्टोणा ग्रामपंचायतीच्या तत्कालीन बहुचर्चीत वादग्रस्त ग्रामसेविका आरती ज्ञानेश्वर वडुले आणि तीचा तोतया न्यायाधिश पती मारोती किसन मुलुक यांच्या संगणमताने नोकरीचे आमिष दाखवुन सुशिक्षीत बेरोजगारांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. प्रकरणी दोनही तोतयेगिरां विरोधात वडकी पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

             दिपक पंढरीनाथ पवार रिधोरा तथा सौरभ राजेश भुते वाघोली हिंगणघाट,जिल्हा वर्धा असे फसवणुक झालेल्या पिडितांची नावे आहेत. या दोघां कडुन एकुण 69 लाख रूपये नोकरी लावुन देण्याच्या नावाखाली गंडा घातला होता. मात्र प्रदिर्घ कालावधी नंतरही नोकरी मीळाली नसल्याने त्यांची चौकशी करण्यात आली होती.यामध्ये ग्रामसेविका आरती वडुले हिचा पती तोतया न्यायधिश असल्याचे आढळून आले त्यामुळे त्या दोघाही ठगा विरोधात वडकी पोलीसात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र 10 ते 12 दिवसाचा कालावधी होऊनही ते दोघे महाठग पोलीसांना गुंगारा देत आहे. कोट्यावधीची फसवणूक करणारे ग्रामसेविका आरती वडुले व तीचा तोतया न्यायधीश पती मारोती मुलुकाच्या शोधात पोलीस तपास सुरु असला तरी पोलीस आरोपी पर्यंत पोहचण्यात सद्या तरी अपयशी ठरले आहे. त्यामुळे हे महाठग आणखीअनेक बेरोजगारांची फसवणुक करण्याची भीती व्यक्त होत आहे.आता पर्यंत जिल्ह्यातील बेरोजगारांना जाळ्यात ओढून फसविले असुन जिल्हाबाह्यही बेरोजगारांना फसविल्याची चर्चा जोरात रंगु लागली आहे. राज्यात या महाठगाचे नेटवर्क असुन स्थानिक कर्मचाऱ्यांच्या संगणमताने यांचा गोरखधंदा सुरु असल्याची खमंग चर्चा आहे. असाच प्रकार राळेगाव पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या आष्टोणा ग्रामपंचायती मध्ये तत्कालीन बहुचर्चीत वादग्रस्त ग्रामसेविका आरती ज्ञानेश्वर वडुले यांनी पती औरगाबाद येथील हायकोर्टात न्यायधिश असल्याचे सांगुन क्लर्कची जागेवर नोकरी लावुन देण्याचे आमीष देऊन अनेकांना गंडवगले आहे. आरती वडुले ही ग्रामसेविका सन 2024 मध्ये आष्टोणा येथे कार्यरत होती. ती ग्रामसेवक पदावर कार्यरत असल्यामुळे अनेकांनी विश्वास ठेवला होता.मात्र तीच बेरोजगारांना या तोतयेगीरीची मुख्यसुत्रधार निघाली असुन राज्यात नोकरी लावुन देण्याच्या आमिषाखाली ती ग्रामसेवकाचे कर्तव्य न बजावता ग्राहक शोधण्यात व्यस्त असल्याचे आढळुन आले होते. त्यामुळे तीच्या कडुन ग्रामपंचायत कारभार काढुन तीला पंचायत समिती मध्येच जमा ठेवण्यात आले होते. मात्र तरीही ही आरती वडुले संधी न गमावता ओळखीच्या लोका कडुन नोकरीचे आमीष देत कोट्यावधी रुपये फस्त करीत असल्याच्या चर्चेला उधान आले आहे. आता पर्यंत दोघांनीच पोलीसात तक्रार केल्यामुळे गुन्हे दाखल करण्यात आले असुन अजुनही अनेकांना नोकरीची आशा असल्याने तक्रार करण्यात हिंम्मत करीत नसल्याचे समजते. आरती वडुले व तीचा तोतया न्यायधीश पती मारोती मुलुक पोलीसांना चकमा देत फरार असलेल्या कालावधीत आणखी किती बेरोजगारांना गंडा घालतील याचा काही नेम नाही. मोकाट असलेल्या महाठग ग्रामसेविका वडुले व तीचा महाठग तोतया न्यायधिश पती मारोती मुलुक यांना अटक करण्याचे वडकी पोलीसा समोर आव्हान असुन ते कधी अटक होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.(क्रमशः)

          ब्युरो रिपोर्ट साहसिक                      News-24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!