कोटंबा येथे बैल पोळा व तान्हा पोळा उत्साहात साजरा.स्व. उज्जैनाबाई कोटंबकार ग्रामीण संस्थेद्वारे आयोजन

0

🔥कोटंबा येथे बैल पोळा व तान्हा पोळा उत्साहात साजरा.स्व. उज्जैनाबाई कोटंबकार ग्रामीण संस्थेद्वारे आयोजन.

सेलु -/ तालुक्यातील कोटंबा गावामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा स्व. उज्जैनाबाई कोटंबकार ग्रामीण संस्थेच्या वतीने बैल पोळा व तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते .या पोळ्याला प्रमुख उपस्थिती संस्थेच्या अध्यक्षा व माजी सरपंच रेणुका कोटंबकार, संस्थेचे सचिव रविंद्र कोटंबकार, अँड. अमोल कोटंबकार, गौरी कोटंबकार, साई सत्यम कॉम्प्युटर चे संचालक संजय वांदिले, वसंत भांदक्कर, सीमा कांबळे, नीना उईके, दीपक राऊत, प्रज्ञा काकडे, विजया बेंडे ,शालू फुलझेले, सविता सरोकार, यांची उपस्थिती होती. त्याचप्रमाणे गावातील सर्व शेतकरी बंधू, बालगोपाल मंडळी ,प्रतिष्ठित नागरिक,महिला मंडळ,युवक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. बैल पोळ्यात रेणुका कोटंबकार यांनी सर्व सहभागी जोडयांना नारळ पान आणि टावेल देऊन सन्मान करण्यात आला. बैल पोळ्यात प्रथम क्रमांक अविनाश घूमडे व जीवन गाठे ,द्वितीय आकाश पेटकर व महादेव धरमूळ, तृतीय क्रमांक रुपेश कोटंबकार व धीरज कोटंबकार यांना आणि प्रोत्साहन पर सतीश घूमडे,सचिन झिंले,मंगेश कोटंबकार, संजय तुमडाम, संतोष कोटंबकार, काशिनाथ लोणकर यांना पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आला.तसेच तान्हा पोळ्यात . साधारणता 200 नंदीबैल या ठिकाणी बालगोपाल सहित उपस्थित होते.या कार्यक्रमात प्रथम बक्षीस स्वरा अतुल कोटंबकार, तसेच द्वितीय बक्षीस काव्या रुपेश कोटंबकार, तृतीय बक्षीस रोहन संतोष कोटंबकार यांना देण्यात आला. तसेच प्रोत्साहन पर भूषण गाठे, विक्रांत भांदक्कर, तनुश्री लोणकर, शिवाश कोटंबकार, अवधूत गाते, दुर्गेश वांदिले यांना पाहुण्यांच्या हस्ते वस्तू स्वरुपात बक्षीस देण्यात आले. तसेच सर्व सहभागी बालगोपालाना रेणुका कोटंबकार यांच्या हस्ते भेट वस्तू देण्यात आली. बैल पोळा, तान्हा पोळा सर्व नागरिकांच्या सहकार्याने शांततेत आणि उत्साहात साजरा करण्यात आला. काही नंदी छान संदेश घेऊन आले होते. दोन्ही पोळ्याचे संचालन अशोक कांबळे यांनी योग्य रित्या केले. यासाठी राजेंद्र कोटंबकार, सूरज भोंगाडे,स्वप्निल धरमूळ, नितेश डोळसकर , अतुल काकडे, छत्रपती भलावी,यांचे सहकार्य लाभले. रेणुका कोटंबकार यांनी सर्व गावकऱ्याचे आभार मानले.

            ब्युरो रिपोर्ट साहसिक       News-/24 सेलू,वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!