🔥हेच ते ना.अशोक उईके आणि चमडीचोर या दोघानी राळेगाव मतदार संघात आदिवाशी च्या जमिनी बळकाविण्याचे सुरू केले काम 🔥हाच तो भाजप चा यवतमाळ जिल्हा सचिव चमडीचोर सतीश मानलवार याला राणा प्रताप नगर गेट वर महिला नी चपलेने झोडपले
🔥अधिकारी वेठीस, जनतेवर अत्याचार: उईके-मानलवार जोडीविरोधात राळेगाव मतदारसंघात तीव्र संताप; ॲट्रॉसिटीसह गुन्हे दाखल करून कारागृहात डांबण्याची समाजात संतप्त मागणी!
यवतमाळ-/ यवतमाळ जिल्ह्याच्या राजकीय पटलावर सत्ताधाऱ्यांची दडपशाही आणि मनमानी कारभार शिगेला पोहोचला असून, राळेगावचे आमदार तथा चंद्रपूरचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्यावर सत्तेचा गैरवापर करत प्रशासनाला वेठीस धरल्याचे गंभीर आरोप होत आहेत. त्यातच त्यांचे निकटवर्तीय तथा भाजप जिल्हा सचिव सतीश मानलवार यांच्या कथित बेकायदेशीर कारभाराने संतापाची लाट उसळली आहे. आदिवासी बांधवांच्या बेनामी जमिनी हडप करून परस्पर विकल्याचे गैरव्यवहार उघडकीस आणणाऱ्या डोफे यांच्यावर मानलवार आणि त्यांच्या टोळीने जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे. या प्रकरणावरून समाजबांधवांमध्ये तीव्र असंतोष खदखदत असून, मानलवारला पदावरून हटवून थेट कारागृहात डांबण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
यवतमाळ जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सध्या अभूतपूर्व चुरस आणि सत्तासंघर्ष पाहायला मिळत आहे. मात्र, या संघर्षात विकासाचे मुद्दे बाजूला पडून राजकीय दबाव, अरेरावी आणि प्रशासकीय यंत्रणेवरील मनमानी ताबा यावरून मोठे वादंग निर्माण झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राळेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. अशोक उईके यांची यवतमाळच्या स्थानिक राजकारणातील अनावश्यक लुडबूड आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना वेठीस धरण्याची प्रवृत्ती वाढल्याचा आरोप राजकीय व सामाजिक वर्तुळातून उघडपणे केला जात आहे. राळेगाव मतदारसंघात सत्ताधाऱ्यांच्या वरदहस्तामुळे सामान्य नागरिक, शेतकरी आणि विशेषतः आदिवासी बांधव त्रस्त झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. भाजपचे जिल्हा सचिव सतीश मानलवार हे पालकमंत्री अशोक उईके यांच्या आशीर्वादाने पदाचा सर्रास गैरवापर करत असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. राळेगाव विधानसभा क्षेत्रातील गरीब आदिवासींच्या शेकडो एकर बेनामी जमिनी नियमबाह्य पद्धतीने बळकावून त्या परस्पर विकण्याचे काळे धंदे मानलवार यांच्या माध्यमातून चालवले जात असल्याची चर्चा सध्या तालुक्यात उघडपणे सुरू आहे. या गैरकृत्यांमुळे अनेक निष्पाप कुटुंबांवर रस्त्यावर येण्याची पाळी आली आहे.
सतीश मानलवार यांचे हे कथित गैरव्यवहार आणि जमिनीच्या खरेदी-विक्रीतील घोटाळे डोफे यांनी पुराव्यानिशी चव्हाट्यावर आणले. हा गैरव्यवहार उघड झाल्याच्या रागातून मानलवार आणि त्यांच्या जवळपास ५४ जणांच्या सशस्त्र टोळीने डोफे यांच्यावर थेट प्राणघातक हल्ला चढवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजवणाऱ्या या टोळीवर तातडीने कठोर कारवाई होणे अपेक्षित होते; मात्र राजकीय दबावामुळे कारवाईत टाळाटाळ होत असल्याचा आरोप पीडित आणि त्यांच्या समर्थकांनी केला आहे. एकीकडे ५४ जणांच्या टोळीने केलेला जीवघेणा हल्ला आणि दुसरीकडे आदिवासींच्या हक्कांवर गदा आणल्याप्रकरणी संबंधितांवर ॲट्रॉसिटी तसेच खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी कठोर कलमांन्वये गुन्हे नोंदवून त्यांना थेट मध्यवर्ती कारागृहात डांबणे आवश्यक होते. मात्र, अशा गंभीर परिस्थितीतही पालकमंत्री डॉ. अशोक उईके हे सतीश मानलवार यांच्या बचावासाठी पुढे आल्याचे चित्र दिसत आहे. पालकमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे पोलीस आणि प्रशासनाचे हात बांधले गेले आहेत का, असा संतप्त सवाल आता सामान्य जनतेतून विचारला जात आहे. गुन्हेगारांना राजकीय संरक्षण देऊन कायद्याची थट्टा उडवली जात असल्याचा आरोप विरोधकांसह स्थानिक नागरिक करत आहेत.
सतीश मानलवार यांच्या वाढत्या गुंडगिरी आणि मनमानी कारभारामुळे संबंधित समाजबांधवांमध्येही तीव्र असंतोष पसरला आहे. आगामी काळात होणाऱ्या समाज मेळाव्यात अशा गैरकृत्ये करणाऱ्या, समाजाची बदनामी करणाऱ्या आणि निरपराध लोकांचे नुकसान करणाऱ्या व्यक्तींना अजिबात थारा देऊ नये, अशी स्पष्ट आणि आक्रमक भूमिका समाजातील ज्येष्ठ व तरुण कार्यकर्त्यांनी घेतली आहे. मानलवार यांची भाजपच्या जिल्हा सचिव पदावरून तत्काळ हकालपट्टी करण्यात यावी, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा समाजबांधवांच्या वतीने देण्यात आला आहे. डॉ. अशोक उईके यांच्या सत्तेचा प्रभाव आणि मानलवार यांच्या कथित गावगुंडगिरीमुळे राळेगाव मतदारसंघातील सामाजिक आणि राजकीय सलोखा धोक्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचे तीव्र पडसाद संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात उमटत असून, शासन आणि गृहखात्याने या प्रकरणात तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. हा वाढता जनक्षोभ आगामी काळात सत्ताधाऱ्यांना राजकीयदृष्ट्या चांगलाच महागात पडण्याची चिन्हे दिसत आहेत.(क्रमशः)