🔥हाच तो यवतमाळ भाजप चा मस्तावलेला सचिव व प्रशिध चमीडचोर सतीश मानलवार
🔥कृष्णापुरात खैरलांजीची पुनरावृत्ती रोखण्यात प्रशासन अपयशी,भाजप जिल्हा सचिव चमडीचोर लुच्छा सतीश मानलवारविरोधात तीव्र संताप, तात्काळ हकालपट्टीची मागणी
🔥दलित कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचा डाव: गुन्हा नोंदवूनही कलमे सौम्य; बाभुळगावच्या तहसीलदार व ठाणेदारांच्या भूमिकेवर गंभीर संशय
बाभुळगाव -/ तालुक्यातील कृष्णापूर येथे एका सुशिक्षित दलित कुटुंबावर झालेल्या गंभीर अन्यायामुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात भाजपचा जिल्हा सचिव चमडीचोर लुच्छा सतीश मानलवार याच्याविरुद्ध बाभुळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी प्रशासकीय दबावातून गुन्ह्याची तीव्रता कमी करण्याचा आणि कलमे सौम्य करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप होत आहे. एका मुलीचे आयुष्य धोक्यात आणणाऱ्या आणि खैरलांजीसारख्या गंभीर प्रसंगाची आठवण करून देणाऱ्या या घटनेनंतरही स्थानिक तहसीलदार व ठाणेदारांनी घटनास्थळी भेट न दिल्याने संताप व्यक्त होत असून, पक्षातून चमडीचोर लुच्छा सतिष मानलवारच्या हकालपट्टीची मागणी जोर धरू लागली आहे. बाभुळगाव तालुक्यातील कृष्णापूर येथे घडलेल्या एका गंभीर घटनेने तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे. एका सुशिक्षित आणि शांतताप्रिय दलित कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचा कट आखल्याचा थेट आरोप भाजपचे जिल्हा सचिव सतीश मानलवार यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी बाभुळगाव पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा नोंदवण्यात आला असला, तरी पोलीस प्रशासनाने नोंदवलेल्या कलमांवरून नागरिकांमध्ये आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. प्रत्यक्ष घडलेल्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात न घेता, दबावाखाली येऊन गुन्ह्याची तीव्रता कमी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप पीडित पक्षाकडून आणि स्थानिक जनतेकडून केला जात आहे. कृष्णापूर येथील घटना अतिशय संवेदनशील आणि खैरलांजी प्रकरणासारखी भीषण वळणे घेणारी असताना, स्थानिक प्रशासनाची भूमिका अत्यंत संशयास्पद आणि उदासीन दिसून आली. घटनेचे गांभीर्य असतानाही बाभुळगावच्या तहसीलदार मीरा पागोरे तसेच पोलीस ठाण्याच्या ठाणेदार दीपमाला भेंडे यांनी घटनास्थळी साधी भेट देण्याचेही सौजन्य दाखवले नाही. पीडित कुटुंबाचे सांत्वन करणे किंवा घटनास्थळाची पाहणी करून तातडीने कठोर पावले उचलण्याऐवजी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे पाठ फिरवल्याने सामान्य जनतेमध्ये संताप व्यक्त होत आहे. सत्तेच्या दबावाखाली येऊन महसूल आणि पोलीस प्रशासन आरोपीच्या बचावासाठी काम करत आहे का, असा थेट सवाल आता उपस्थित केला जात आहे. स्थानिक पातळीवर चर्चेनुसार, सतीश मानलवार यांच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गैरव्यवहारांचे आरोप झाले आहेत. कृषी केंद्राच्या नावाखाली शेतकऱ्यांसाठी असलेल्या शासकीय योजना हडप करणे आणि गरजू शेतकऱ्यांना भरमसाठ व्याजाने पैसे देऊन त्यांची आर्थिक पिळवणूक करणे, अशा अनेक गैरकृत्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचे बोलले जात आहे. एका मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या कृत्यानंतरही राजकीय नेते आणि वरिष्ठ यंत्रणा संबंधित पदाधिकाऱ्याला पाठीशी का घालत आहेत, असा सवाल विचारला जात आहे. इतके गंभीर आरोप असतानाही प्रशासकीय अधिकारी कारवाई करण्यास कचरत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. या घटनेचे पडसाद आता केवळ विरोधकांमध्येच नव्हे, तर खुद्द सत्ताधारी पक्षातही उमटू लागले आहेत. बाभुळगाव, कळंब आणि राळेगाव तालुक्यातील भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गोरगरीब आणि दलित घटकांवर अन्याय करणाऱ्या अशा व्यक्तीमुळे पक्षाची प्रतिमा डागाळत असून, पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाने सतीश मानलवार यांची पदावरून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी एकमुखी मागणी कार्यकर्त्यांमधून पुढे येत आहे. पक्षातील वरिष्ठांचा वरदहस्त असल्यामुळेच हा पदाधिकारी मनमानी कारभार करत असून, आता यावर थेट पक्षश्रेष्ठींनी दखल घेण्याची वेळ आली आहे. या संपूर्ण प्रकरणात गुन्ह्याची कलमे वाढवून पीडित कुटुंबाला संरक्षण द्यावे, तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी केली आहे. पीडित कुटुंबाला त्वरित न्याय न मिळाल्यास आणि आरोपीवर कठोर कलमान्वये तात्काळ अटकेची कारवाई न झाल्यास तालुका व जिल्हा स्तरावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.(क्रमशः)