आमदार राजु तोडसामचा नवा फंडा 5 कोटीच्या कामासाठी 50 लाखाची मागणी , पिए अक्षय वातील व जावेदच्या वसुलीने कंत्राटदार हैरान 

0

🔥हेच ते आमदार प्रा. राजूभाऊ तोडसाम चे स्वीय सहायक अक्षय वातीले करतात आमदार तोडसाम ची वसुली

🔥आमदार राजु तोडसामचा नवा फंडा 5 कोटीच्या कामासाठी 50 लाखाची मागणी , पिए अक्षय वातील व जावेदच्या वसुलीने कंत्राटदार हैरान 

🔥आदिवासींच्या हक्काच्या निधीवर डल्ला! शाळा रंगरंगोटी आणि पाणीपुरवठा योजनांत लाखोंचा भ्रष्टाचार; गृहमंत्री, ग्रामविकास मंत्र्यांकडे तक्रार

यवतमाळ -/ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यांतर्गत येणाऱ्या मौजा जांब ग्रामपंचायतीमध्ये ‘पेसा’ ग्राम कोष निधी, १५ वा वित्त आयोग, जिल्हा परिषद शाळा रंगरंगोटी आणि कर वसुलीच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप समोर आला आहे. आदिवासी कल्याणासाठी राखीव असलेला निधी नियमबाह्यपणे डाटा ऑपरेटर्सना वाटणे, एकाच दिवशी एकाच रकमेचे दोन धनादेश काढून शासनाची फसवणूक करणे आणि कोलाम पोडवरील नळ योजना बंद ठेवणे, असे गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणी आर्णी केळापुर मतदार संघाचे आमदार राजु तोडसाम यांनी नविनच फतवा जारी केल्याने कंत्राटदार त्रस्त झाले आहे. 5 कोटीची कामे करायची असल्यास संबधीत कंत्राटदाराला 50 लाख मोजावे लागणार असल्याचे सांगितले त्यामुळे कुणीही सहसा काम करण्यास तयार नाही .जांब येथील ग्रामपंचायत येथील विद्यमान सरपंच रमेश सिडाम, माजी प्रभारी सरपंच राजेंद्र मडावी व ग्रामसेवक अरुण जांभुळकर यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करून अपहार केलेला निधी वसूल करण्याची मागणी माजी सरपंच नथ्थू भिमा वेट्टी यांनी राज्याचे गृहमंत्री आणि ग्रामविकास मंत्र्यांकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे.

घाटंजी तालुक्यातील मौजा जांब ग्रामपंचायतीच्या कारभारात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरप्रकार आणि भ्रष्टाचार झाल्याचे प्रकरण समोर आल्याने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पेसा ग्राम कोष समितीचे अध्यक्ष तथा विद्यमान सरपंच रमेश सिडाम, माजी उपसरपंच तथा प्रभारी सरपंच राजेंद्र मडावी आणि ग्रामपंचायत सचिव (ग्रामसेवक) अरुण जांभुळकर यांनी संगनमत करून शासनाच्या विविध योजनांतील लाखो रुपयांचा निधी हडप केल्याचा गंभीर आरोप जांब ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नथ्थू भिमा वेट्टी यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, अमरावती विभागीय आयुक्त, यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि घाटंजीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे रजिस्टर पोस्टाने व समक्ष पुराव्यानिशी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीतील माहितीनुसार, पेसा ग्राम कोष निधी हा केवळ आदिवासी बांधवांच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी खर्च करणे बंधनकारक आहे. मात्र, जांब ग्रामपंचायतीने नियमांना धाब्यावर बसवून या निधीतून ग्रामपंचायत डाटा ऑपरेटर्सना लाखो रुपये अदा केले आहेत. यामध्ये प्रफुल गावंडे यांना धनादेश क्रमांक ०५४९६९ द्वारे ७२ हजार ४०० रुपये, रवींद्र तुमराम यांना धनादेश क्रमांक ०५४९७० द्वारे ८६ हजार ९६० रुपये आणि धर्मेंद्र कांबळे यांना धनादेश क्रमांक ०५४९६७ द्वारे ८५ हजार ६१० रुपये असे एकूण २ लाख ४७ हजार ७०० रुपये नियमबाह्य पद्धतीने वितरित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, ३१ जुलै २०२१ रोजी पेसा ग्राम कोष निधीत १७ लाख ४९ हजार १९ रुपये ४० पैसे शिल्लक दाखवले जात असले, तरी २०२३ पर्यंत या निधीत मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच तेंदुपत्ता बोनस वाटपातही मोठा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.१५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीला रंगरंगोटी केल्याचे कागदोपत्री दाखवून शासनाची उघड फसवणूक करण्यात आली आहे. या कामात एकाच दिवशी म्हणजेच १७ मार्च २०२१ रोजी ‘ज्ञानदीप ट्रेडर्स’ला धनादेश क्रमांक ५४९९४ द्वारे १ लाख ४७ हजार ५०० रुपये देण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे, त्याच दिवशी (१७ मार्च २०२१) ‘अमरदीप वानखडे व इतर’ यांनाही धनादेश क्रमांक ५४९९७ द्वारे तितकीच म्हणजेच १ लाख ४७ हजार ५०० रुपयांची रक्कम अदा करण्यात आली. एकाच कामासाठी, एकाच तारखेला आणि एकाच रकमेचे दोन स्वतंत्र धनादेश काढून निधीची लूट केल्याचा आरोप वेट्टी यांनी केला आहे.

१५ वा वित्त आयोग आणि पेसा ग्राम कोष निधीतून सुरू असलेली कोलाम पोडवरील नळ पाणीपुरवठा योजना सध्या पूर्णपणे बंद पडली आहे. खुद्द जांब गावातही नागरिकांना एक दिवसाआड पाणीपुरवठा होत असून पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. सन २०२३ मध्ये ग्रामपंचायत खात्यात ३८ लाख ५४ हजार ८८२ रुपये शिल्लक दाखवण्यात आले होते. परंतु, मासिक सभा किंवा ग्रामसभेत या निधीतून कोणती कामे झाली, याचा कोणताही हिशोब सरपंच व सचिवांनी सादर केलेला नाही. १५ व्या वित्त आयोगाच्या कृती आराखड्यानुसार ‘जेम’ (GeM) पोर्टलवरून निविदा न काढताच परस्पर साहित्य खरेदी करून लाखो रुपयांचा मलिदा लाटण्यात आला आहे.

ग्रामपंचायतीने नागरिकांना गृहकर व पाणीकराची मागणी बिलेच बजावली नाहीत. मात्र, सप्टेंबर २०२३ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांकडून कर वसुली करून त्यांना पावत्या देण्यात आल्या. नियमानुसार ही जमा झालेली रक्कम ७ दिवसांच्या आत ग्रामपंचायतीच्या सामान्य फंडात भरणे आवश्यक असताना, सरपंच व सचिवांनी ती रक्कम स्वतःसाठी वापरून अपहार केला आहे. याशिवाय, शासनाच्या नियमाप्रमाणे महिला व बालकल्याणासाठी १० टक्के आणि दिव्यांग बांधवांसाठी ५ टक्के निधी खर्च करणे बंधनकारक असतानाही, जांब ग्रामपंचायतीने या दोन्ही घटकांवर एक रुपयाही खर्च केलेला नाही. ​या सर्व गंभीर प्रकरणांची उच्चस्तरीय समितीमार्फत सखोल चौकशी करून दोषी सरपंच, माजी प्रभारी सरपंच व ग्रामसेवकाकडून भ्रष्टाचाराची रक्कम वसूल करावी आणि त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी जोरदार मागणी माजी सरपंच नथ्थू वेट्टी यांनी केली आहे. आता वरिष्ठ प्रशासन यावर काय कारवाई करते, याकडे संपूर्ण घाटंजी तालुक्याचे लक्ष लागले आहे.(क्रमशः)

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!