वर्ध्यात जागतिक महिला दिनी आंबेडकरी महिला कार्यकर्त्यांचा पेट्रोल पंप स्थलांतरित करावा या मागणीसाठी रस्त्यावर उतरून केला एल्गार…!
प्रतिनिधी/ वर्धा :
आज जागतिक महिला दिनी आंबेडकरी महिला कार्यकर्त्यां पेट्रोल पंप हटाव कृती समितीच्या वतीने वर्धा शाहरातून रॅली काढुन डा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सिव्हिल लाईन येथे अभिवादन केले.आंबेडकरी नेत्या वैशाली पाटील व वर्धा नगरपालिकेच्या सदस्या पद्मा रामटेके यांनी जागतिक महिला दिन साजरा केला व साखळी उपोषण केले. संविधान निर्माते डा.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील पोलिस वेल्फेअरच्या पेट्रोल पंपची जागा स्थलांतरित करण्यात यावी या मागणीसाठी पेट्रोल पंप हटाव कृती समितीच्या आंदोलनात महिला सहभागी होऊन 175 व्या दिवशी प्रशासन व सरकारच्या विरोधात साखळी उपोषण करुन सरकार आणि वर्धाचे पालकमंत्री,आमदार,खासदार तसेच जिल्हाधिकारी-जिल्हा पोलिस अधीक्षक प्रशासनाच्या विरोधात पेट्रोल पंप ची जागा स्थलांतरित करण्यात यावी या मागणीसाठी एल्गार पुकारून तीव्र निषेध केला आहे.
शासन व सुप्रीम कोर्ट ऐतिहासिक स्थळांची जपवणूक व देखभाल करण्यासाठी प्रशासनाला आदेश देते परंतु संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पन्नास वर्षे उलटून गेली अशा वर्धा शहरातील केंद्र बिंदू असलेल्या तसेच भीमसैनिक व बहुजनांच्या ऐतिहासिक धरोहराच्या परिसराचे,जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक प्रशासनाद्वारे,शासनाच्या मालकीचा पेट्रोल पंप उभारून विद्रुपीकरण केल्या जात आहे.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील पोलिस प्रशासन मालकीच्या हिंदुस्थान कंपनीच्या पेट्रोल पंपची जागा त्वरित स्थलांतरित करावी.राज्य सरकार तसेच पालकमंत्री सुनिल केदार यांनी प्रशासनाला पेट्रोल पंप हटविण्याचे निर्देश द्यावे.गेल्या सहा महिन्या पासुन आंबेडकरी अनुयायांचे आंदोलन सुरु आहे परंतु सरकार व काँग्रेस-भाजपच्या आमदारांना , पालकमंत्री व प्रशासन – सरकारला जाग आली नाही . अशा मुर्दाड लोकप्रतिनिधी व प्रशासनाचा तीव्र निषेध आहे.