धक्कादायक: बनावट रेशन कार्ड तयार करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल
प्रतिनिधी/ मुक्ताईनगर:
मुक्ताईनगर तहसील कार्यालयात बनावट सही शिक्के व बनावट शिधापत्रिका (रेशन कार्ड) बनवून शासनाची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे.
मुक्ताईनगर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुक्ताईनगर तहसील कार्यालयात गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेला बनावट सही शिक्क्याचा वापर करून बनावट रेशन कार्ड अर्थात शिधापत्रिका तयार करून शासनाची दिशाभूल करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये संशयीत आरोपी अजाबराव सिताराम पाटील आणि पांडुरंग जयराम पाटील दोन्ही रा. चिखली तालुका .मुक्ताईनगर यांनी 14 आक्टोंबर 20 20 ते 14 फेब्रुवारी 2022 या कालावधीत तहसिल कार्यालयातच बनावट सही शिक्के व बनावट रेशन कार्ड तयार करत असल्याचा धक्कादायक माहिती समोर आल्याने मुक्ताईनगर तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. या दोघांवर प्रभारी पुरवठा निरीक्षक प्रदीप धनुसिंग आडे( वय-42)रा. नांदेड यांच्या तुझ्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहे.