वर्धा जिल्हात अवकाळी पावसाने लावली हजेरी ; शेतमालाचं मोठं नुकसान
साहसिक न्युज 24 रिपोर्ट :
वर्ध्यात वाढत्या तापमानानंतर आज सव्वाचार वाजता सुमारास कारंजा शहरासह ग्रामीण भागात विजेच्या कडकडाटसह वादळी वाऱ्यासोबत अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक झालेल्या पावसाने काही प्रमाणात उष्णतेचे प्रमाण कमी झाले आहे. जिल्ह्यातील तापमान 45. 5 अंशावर पोहचले असताना अनेकांना उन्हाचा तडाखा बसला होता.यात वाढत्या उन्हामुळे अनेकांना जीवन लाहीलाही झाले होते.दुपारच्या सुमारास वाढत्या उष्णतेचे परिणाम नागरिकांना जाणवत होते. मात्र आज झालेल्या पावसामुळे वाढत्या तापमानाला काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे.
आज झालेल्या पावसामुळे कारंजा शहरातील उप बाजार समिती प्रांगणात साठवून ठेवण्यात आलेला शेतमाल अचानक आलेल्या पावसामुळे भिजला. साठवून ठेवण्यात आलेला शेतमालमध्ये गहू, हरभरा, तूर समावेश आहे. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.