संपादक कोंटबकर हल्ला प्रकरण; दुसरा आरोपी अटकेत
साहसिक न्युज 24 :
वर्धा येथील संपादक रवींद्र कोंटबकर यांच्या झालेल्या प्राण घातक हल्ल्यातील दुसऱ्या हल्लेखोराला अटक करण्यात पोलिसांना यश आले.
मिळालेल्या माहितीनुसार, येथील दैनिक साहसिक या वुत्तपत्राचे मुख्य संपादक रवींद्र कोंटबकर यांच्यावर १८ एप्रिल रोजी रात्री वर्धा पवनार मार्गावर हॉटेल डीलाईट जवळ असलेल्या पुलाखाली १० ते १५ मारेकऱ्यांना प्राणघातक हल्ला केला होता. त्यातील नागपूर येथील एकाला मागील आठवड्यात औरंगाबाद येथील करमाळा येथून अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी हल्ल्यात वापरलेले वाहन आणि अटक केलेल्या आरोपीचे कपडे जप्त केले. दरम्यान, या घटनेतील दुसरा आरोपी अजय चांदेकर वय ३५ वर्षं रा. बोरगाव (मेघे) याला अटक केल्याची माहिती सेवाग्राम पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक निलेश ब्राम्हणे यांनी दिली.