सेलूच्या चांगळ नंतर आता सावंगीच्या आय पी एल स्ट्ट्याचा बोलबाला

0

साहसिक न्यूज 24 /वर्धा :
सेलू येथील चंगळ जुगारावर झालेल्या मोठ्या कारवाई नंतर आता आय पी एल सट्टा वर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहेय. आय पी एल जुगार खेळल्या जात असलेल्या फार्म हाऊसवर पोलिसांनी छापा टाकला आहे.
वर्ध्यात आयपीएल क्रिकेट मॅच वर सुरू असलेल्या सट्टावर धाड टाकत होमेश्वर वसंतराव ठमेकर यांच्या सावंगी मेघे येथील फॉर्म हाऊसवर कायदेशीररीत्या प्रवेश करून आयपीएल ऑनलाईन क्रिकेट सट्टा-जुगारवर छापा टाकलाय.. यामध्ये सहा आरोपीना अटक केली असून होमेश्वर वसंतराव ठमेकर, प्रवेश चिनेवार,अशोक ढोबळे, गिरीश क्षिरसागर, दिनेश प्रताप नागदेव, अविन गेडाम, अशी अटक केलेल्या आरोपीचे नावे आहे. डीवाय पाटील स्टेडियम, नवी मुंबई येथे सुरू असलेल्या पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन या संघाच्या आयपीएल २०-२०  ओव्हरचे मॅचवर सट्टा सुरू होता. यावर कारवाई केली असून
3 टीव्ही संच,10 अँड्रॉइड मोबाईल संच, 36 साधे किपॅड मोबाईल,3 रेकॉर्डर संच,1 वायफाय डोंगल, 2 लॅपटॉप, 1 इन्वर्टर, एक बॅटरी व एक हिशोबाची डायरी, महागड्या कंपनीचे चारचाकी वाहन, 3 दुचाकी वाहने व इतर साहित्य असा एकुण 26 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथे जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर प्रकरणाचा तपास सुरु असून इतर जिल्ह्याचे बुकीशी तार जूळले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
या कारवाई नंतर वर्ध्यात प्रवेश करणाऱ्या विदेशी दारू तसेच बनावट दारूच्या अड्ड्यावर छापा टाकण्याची मोहीम देखील उघडली जाणार का असाच प्रश्न जनतेकडून विचारला जातो आहेय.
             

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!