पवनार येथील शेतकऱ्याची आत्महत्या
प्रतिनिधी / पवनार:
येथील शेतकरी आशीष भट यांनी काल दि.८ मे रोजी आपल्या शेतात गळफास घेवून आत्महत्या केली.
सविस्तर वृत्त असे की आशिष भट हे रविवारी रात्री १० वाजता शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते.परंतु बराच वेळ झाला तरी परत आले नसल्याने घरच्यांनी त्याला संपर्क केला परंतु संपर्क होत नसल्याने बाजूच्या मित्रांना रात्री त्याचा शोध घेण्यासाठी पाठविले असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढलून आला. या घटनेची माहिती घरच्यांना व सेवाग्राम पोलिसांना दिली. त्याने फाशी घेतली की त्याची हत्या झाली हे अजून कळले नसून पोलीस चौकशी करत आहे.