वरणगांव फॅक्टरीत मुलीचा घातपात की गळफास ?

0

साहसिक न्यूज24 प्रतिनिधी/भुसावळ –
तालुक्यातील वरणगांव फॅक्टरी मधील कॉटर नंबर194/बी मधील रहिवाशी कुमारी आकांक्षा शरद पगारे वय 20या मुलीने आपल्या राहत्या बिल्डिंगच्या गच्चीवर ओढणीने गळफास न घेता उजव्या बाजूच्या गच्चीवर गळफास घेतल्याचे सकाळी
निदर्शनास आल्याने परिसरात खळबळ उडाली. मुलीचा घातपात की
गळफास ? हे सांगणे कठीण आहे. घटनास्थळी वरणगांव पोलीस
स्टेशनचे सपोनि व कर्मचारी दाखल झाले असून चौकशी करीत आहे.
वरणगांव फॅक्टरीमध्ये रोज काही न काही घटना घडत आहे. एका
सहा वर्षाच्या बलिकेचा मृत्यू झाला आहे. तर फॅक्टरीत स्फोट
झाल्याने एक कंत्राटी कामगारांचा एक हात भाजला असून एक डोळा निकामी झाला आहे. त्यात आजरोजी कॉटर नंबर194/बी मधील रहिवाशी कुमारी आकांक्षा शरद पगारे वय 20 या मुलीला ओढणीने गळफास देण्यात आला की तिचा सोबत घातपात झाला ही एक संशोधनाची बाब आहे. डाव्या बाजूच्या बिल्डिंग मध्ये मुलगी
राहते त्या बिल्डिंगच्या उजव्या गच्चीवर अगदी कमी जागेत ओढणीने
गळफास घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. परिसरातील
नागरिकांनी झालेल्या घटनेची माहिती वरणगांव पोलीस स्टेशनला
कळविली असता त्वरित सपोनि व पोलीस कर्मचारी घटनास्थळी
दाखल होऊन पंचनामा केला आहे. वरणगांव फॅक्टरी मधील मुख्य
दवाखान्यात दुपारी 12.20 वाजेच्या दरम्यान शवविच्छेदनासाठी मृतदेह आणला होता.सदर घटनास्थळी कमी जागेत मृतदेह मिळाल्याने व नेमके गळफास घेण्याचे मागील कारण काय असावे याचा शोध पोलीस प्रशासन घेत आहे. गळफास घेण्याबाबत परीसरातून नागरिकांना विचारपूस ही
करण्यात आलेली आहे. पोलीस प्रशासनाच्या हाती कुठलाही पुरावा
न लागल्याने पोलिसांचा संशय दाट झाला असून मुलीने गळफास न
घेता घातपात झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस प्रशासन
त्या दिशेने आपली तपास चक्र फिरवीत आहे. मुलीसोबत घातपात
करून ओढणीने लटकविण्यात आले आहे की काय ? हे शवविच्छेदन झाल्यानंतर समोर येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!