दिघी बोपापुर रस्त्याच्या बांधकामाचे पैसे गेले अभियंता व ठेकेदार वैभव कापसे यांच्या घशात
Byसाहसिक न्युज 24
प्रतिनिधी / देवळी:
तालुक्यातील दिघी(बो.) मार्गे जाणारे नागरिक गेल्या पाच वर्षांपासून खराब रस्त्यामुळे नरक यातना सोसत होते.यातच खराब रस्त्यामुळे नागरिकांना दररोज समस्यांचा सामना करावा लागत होता.या मार्गावरील अनेक गावातील शाळेकरी, विद्यार्थी,शेतकरी,नोकर वर्गांना तसेच इतर नागरिकांचा आवगमनाचा प्रमुख रस्ता आहे.खराब रस्त्यामुळे या मार्गावर अनेक गंभीर अपघात झाले यामध्ये काहींची जीवितहानी झाली तर अनेकांना गंभीर दुखापत होऊन अपंगत्व आले.आता पाच वर्षानंतर देवळी ते दिघी(बो.) पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ८० लक्ष रुपये खर्च करून ५ किलोमीटरचे डांबरी रस्त्याचे बांधकाम सुरू झाले.परंतु हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याची नागरिकांची मोठ्या प्रमाणात ओरड होती.यातच दिघी(बो.) नागरिक यांनी एकत्र येऊन वरिष्ठ अधिकारी तसेच मीडिया यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण माहिती दिली व नुकतेच झालेल्या निकृष्ट रस्ता बांधकामाची दखल घेऊन नागरिकांना न्याय देण्याची मागणी केली.व नागरिकांसह खराब रस्त्याची पाहणी केली.रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट केले गेले असून प्राकलना नुसार काम करण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले.काम इतके निकृष्ट करण्यात आले की,डांबर आणि गिट्टीचे आच्छादन रस्ता सोडून निघत होते.आच्छादन इतके पातळ होते की,रस्ता बनविल्यानंतर सुद्धा खालचा रस्ता स्पष्ट दिसत होता.यावेळी बांधकाम अभियंता राणे यांना स्वतः निकृष्ट कामाची पाहणी करण्यास बोलविण्यात आले.त्यांनी संपूर्ण काम बघितल्यानंतर काम अत्यंत निकृष्ट असल्याची कबुली दिली.यावेळी संतप्त नागरिकांनी प्रश्नांचा भडिमार केला.यावेळी नागरिकांनी बांधकाम अभियंत्याना निवेदन दिले.यावेळी बांधकाम अभियंत्यांनी सदर कामात शेवटपर्यंत गुणवत्ता राखून ठेकेदाराकडून दर्जेदार काम करून घेण्याचे आश्वासन दिले. याकरिता याप्रसंगी दिघी ते बोपापूर गावकऱ्यांनी दखल घेतली. यावेळी दिघी ते बोपापुर गावातील नागरिक उपसरपंच अमोल दिघीकर,आशिष दिघीकर,हनुमंत पचारे,अश्वजित फुलमाळी,सिद्धांत अवथरे, रजत कांबळे भूषण कांबळे हितेश दिघीकर,दीपक ठाकरे, सागर ढोक,परमेश्वर अवथरे, रोहन आडे, हेमंत इंगळे, प्रीतम कांबळे व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.