युवकाने गळफास लावून केली आत्महत्या

0

 

Byसाहसिक न्युज 24

 

देवळी / सागर झोरे:

 

देवळी शहरात गोंडपुरा येथील एका इसमाने आपल्या घरी गळफास घेवून आत्महत्त्या केली सदर घटना दि.19 जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता च्या दरम्यान घडली याप्रकरणी दाखल फिर्यादीवरुन देवळी पोलिसांनी नोंद दाखल केली असता

पोलिस सुत्राकडून मिळालेल्या माहीती नुसार ,आत्महत्या करणाच्या व्यक्तीचे नाव गौरव संतोषराव धांदे (वय 20 वर्ष) रा.गोंडपुरा, वार्ड क्रमांक १४ देवळी.या युवकाने १९ जुलै मंगळवार रोजी सांयकाळी ७ वाजता च्या दरम्यान राहत्या घरी कोणीही हजर नसतांनी अज्ञात कारणाने गळफास घेवून जिवन संपविल्यानी घटना उघडकीस आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. गौरव संतोषराव धांदे (वय२० वर्ष) हा व्यक्ती लहान भाऊ सोबत राहत होता. लहान भाऊ कामावरुन सायंकाळी ७ वाजता घरी परतला असता दार आतुन बंद असल्याने भीती निर्माण झाली फिर्यादीचे आजी सौ. मिराबाई शंकरराव धोंगडे (वय६२) तसेच आजूबाजूचे लोकांनीं दार तोंडून आत गेले असता गौरव संतोषराव धांदे गळफास लावून दिसला.

अशी माहीती समजली असता सौ. मिराबाई शंकरराव धोंगडे फिर्यादीवरून देवळी पोलिसांनी या प्रकरणी आकस्मीक मृत्युची नोंद केली. तर घटनेचा पुढील तपास देवळी पोलिस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!