पवनारातील इंग्रज कालीन पुलावर खड्डेच खड्डे
Byसाहसिक न्यूज24
पवनार/ सतीश अवचट:
मागील हप्त्यात झालेल्या जोरदार पावसाने धाम नदीला पूर आला होता या पुरात नदीवर असलेला इंग्रज कालीन लहान पुल पूर्ण पाने डूबला होता याच पुलावरून आश्रम कडे जाण्यासाठी मार्ग आहे परंतु पुराच्या पाण्याने या पुलावरील कठडे व रोडला जगो जागी मोठ मोठे खड्डे पडल्याने ये जा करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. तसेच हा पुल इंग्रज कालीन असल्याने कधीही कोसळू शकते.धाम नदीला बाराही महिने मोठ्या प्रमाणात पाणी असते त्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना होवू शकते म्हणून लवकरात लवकर पुलावरील खड्डे व कठडे दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली.