केळझर येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मच्याऱ्याकडून व्यक्तीस मारहाण; सेलू पोलिसांत तक्रार दाखल
साहसिक न्यूज24
प्रतिनिधी / सेलू :
पैसे काढण्याची स्लिप घेण्यावरून बँक ऑफ महाराष्ट्रच्या शिपायाने व्यक्तीस जबर मारहाण केली, ही घटना आज ता, 9 शुक्रवारी केळझर येथे बँकेच्या बाहेर घडली, विनोद यादवराव कैकाडी वय 45 रा, केळझर असे मारहाणीतील जखमीचे नाव आहे, तर विवेक शरद ईश्वरकर व ऋषिकेश शरद ईश्वरकर दोघेही रा, केळझर असे आरोपींची नावे आहेत,
याबाबत मिळालेली माहिती अशी की विनोद कैकाडी हा बँकेच्या बाहेर ग्राहकांना पैसे काढण्याच्या व जमा करण्याच्या स्लिप भरून देण्याचे काम करतो, घटनेच्या वेळी तो बँकेत पैसे काढण्याची स्लिप घेण्यासाठी बँकेत गेला असता, बँकेतील शिपाई विवेक ईश्वरकर याने त्याचेशी वाद घातला, वाद मिटल्यानंतर शिपायाने बँकेच्या बाहेर येऊन आपल्या भावाला बोलावून दोघांनीही विनोदला अश्लील शिवीगाळ करीत लाथा भुक्क्यांनी बेदम मारहाण केली, त्यात त्याचे छातीला, डोक्याला तसेच पोटाला जबर दुखापत झाली, त्याला सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता जास्त मार असल्याने बेशुद्ध अवस्थेत त्याला सेवाग्राम रुग्णालयात रेफर करण्यात आले, तेथे त्याचेवर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहे, घटनेची तक्रार सेलू पोलीस ठाण्यात देण्यात आली असून अधिक तपास सेलू पोलीस करीत आहे,