मायबाप सरकार, देवळीतील ‘फ्रेंच पॉलिश’ पासून विषारी दारू बनवणाऱ्या ‘सुधीर’ची देवळीतील दारू बंद करा!
Byसहासिक न्यूज 24
प्रमोद पाणबुडे/ वर्धा:
राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वांत पोषण माल व राहणीमान उंचावे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे प्राथमिक कर्तव्य असे त्यासाठी मादक पेये व आरोग्यास हानिकारक अंमली द्रव्य यांच्या सेवणावर बंदी आणण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील असं नमूद केल आहे. यामुळे दारूच्या आहरी गेलेली बहुसंख्य गोरगरीब जनता डोळ्यापुढे ठेऊनच स्वातंत्र्यलढ्यात दारूबंदीला महत्त्वाच स्थान राहिल होत, याचचं प्रतिबिंब मार्गदर्षक तत्वातील ४७ व्या कलमात पडलेलं दिसतं, हा विषय राज्याच्या यादीत असल्याने प्रत्येक राज्याने आपापलं धोरण राबविले, महाराष्ट्राचं दारू धोरण राज्यात १९४९ पासून दारू बंदी कायदा अस्तित्वात आहे. दारूबंदीकरिता वर्धा जिल्हाचाही समावेश आहे. परंतु याच जिल्हात सर्वाधिक दारू चा महापूर असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत इतर जिल्हातून देशी विदेशी दारू या जिल्हात आणून विक्री केल्या जात होती, पण आता जिल्हातील देवळी शहरात ‘सुधीर येळणे’ नामक दारू विक्रेता हा चक्क विदेशी दारूच्या एका शिशीमध्ये फ्रेंच पॉलिश भेसळ करून एका शिशीच्या चार शिशा तयार करून विकतो. नशा चांगली येण्याकरिता हे पॉलिश त्यामध्ये टाकून विकतो, या दारुमुळे देवळी शहरातीलच नव्हे तर तालुकेच्या जनतेच्या आरोग्याशी हा दारू विक्रेता खेळतो या दारुमुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना पोटाचे आजार झाले, असल्याचे देवळी शहरातील डॉक्टरांनी सांगितले आहे . एवढेच नाही तर देवळी शहरातीलच जनाबाई नामक महिलेच्या पतीने ही दारू पिल्याने काही महिन्यापूर्वीच त्याचा मूर्त्यू झाला आहे. मग अशा विषारी दारू बनविणाऱ्या दारू विक्रेत्यावर कारवाई का होत नाही , असाच प्रश्न देवळीकरांना पडला आहे.