वाघीणी’साठी पाच पिंजरे तैनात, वनविभाग ‘वेट अॅण्ड वॉच’च्या भूमिकेत
साहसिक न्युज24
प्रतिनिधी/ वर्धा : राज्यातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प असलेला बोर व्याघ्र प्रकल्पाची ओळख आहेत. या प्रकल्पात राणी अशी ओळख असलेल्या एका वाघिणीची मुलगी हिला पकडण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न केले जात आहे. यासाठी नुकतेच वरिष्ठांनी आदेश काढले असून 12 चमू त्यासाठी प्रयत्न केरत आहेत. यासाठी पाच पिंजरे लावण्यात आले आहेत.
वाघिणीचा पाठलाग करण्यासाठी आतापर्यंत 45 ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले असून यातील फक्त तीन कॅमेऱ्यात वाघीण कैद झाली आहे. मात्र, ही वाघीण अजूनही वनविभागाला हुलकावणी देत आहे. यासाठी पाच पिंजऱ्यात पाळीव जनावरे बांधून वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी ‘वेट अॅड वॉच’ च्या भूमिकेत आहेत. या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी बोर व्याघ्र प्रकल्पाच्या तिन चमू तर प्रादेशिक वनविभागाच्या तब्बल नऊ चमू युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत.
पाळीव जनावरांना ठार केल्यावर परतली दाट जंगलात
वाघिणीचे कारंजा तालुक्यातील बांगडापूर परिसरात हल्ल्याच्या घटनेत वाढ होत आहे. यात बांगडापूर जोगा जंगल परिसरात काही दिवसांपूर्वी पाळीव जनावरांची शिकार केली. पण, वाघिणीने या जनावराचा पूर्णतः फस्त केले नसल्याने ती शिकार खाण्यासाठी पुन्हा येईल, असा अंदाज वनविभागाला होता. त्यामुळे सुरुवातीला या ठिकाणावर वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी वॉच ठेवला. शिवाय कॅमेरेही लावले. पण, ती येथे एकदा परतली असून ती ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पण, पुन्हा ती परत आली नसून तिचा अद्यापही शोध लागला नाही. कारंजा तालुक्यातील दाट जंगलात ती परत गेल्याचे सांगण्यात येत आहे. तिला पिंजराबंद करण्यासाठी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.