देवी विसर्जनासाठी गेलेल्या तरूणांचा मुत्यू
साहसिक न्युज24
प्रतिनिधी/ आर्वी :
दुर्गा देवी विसर्जनाकरिता कौंडण्यपूर येथील वर्धा नदीवर जात असताना ट्रॅक्टर ट्रॉलीवरून पडून तरुणाचा मृत्यू झाला. स्वप्नील बनकर (28) रा. दत्तवार्ड आर्वी असे मृतकाचे नाव आहे. सार्वजनिक बाल दुर्गा मंडळ आर्वीचे देवी विसर्जनाकरिता टॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये देवीजवळ बसून असताना त्याचा तोल जाऊन खाली पडल्याने त्याच्या अंगावरून ट्रॅक्टर ट्रालीचे चाक गेले. यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला उपजिल्हा रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला.