वर्ध्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम आयोजन
साहसिक न्युज24
प्रमोद पाणबुडे / वर्धा:
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या तीन दिवसीय चोपणव्या पुण्यतिथी महोत्सवास प्रभातफेरीसह आज सकाळी प्रारंभ झाला.राष्ट्रसंत तुकडोजी विचार प्रतिष्ठानच्या मानस मंदिरातून प्राथमिक शाळेच्या मुलांची प्रभातफेरी काढण्यात आली. राष्ट्रसंत चौकात मुलांनी अभिवादन केले.यावेळी मंडळाचे विजय मंथनवार, शालिग्राम वानखेडे,गोलाईत दादा,पुण्यदास चरडे मनोहर तायडे,मधुकर वाघमारे,मदन जाधव,शिक्षक वर्ग व उपस्थित नागरिकांनी आदरांजली वाहली.यानंतर तिर्थस्थापना, भजन,रामधून व अन्य कार्यक्रम पार पडले.पुढील दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.मंगळवारी सकाळी प्रभातफेरी, सामुदायिक प्रार्थना,ध्यान व भजनाचा कार्यक्रम आहे.मानस हस्तलिखिताचे प्रकाशन होणार आहे.दुपारी तीन वाजता राष्ट्रसंतांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम सुरू होईल.ह भ प पुण्यदासजी चरडे राष्ट्रसंत जीवन दर्शन भजनावली सादर करतील.दुपारी चार वाजून अठ्ठावन मिनिटांस मौन श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.सायंकाळी पाच वाजता सर्वधर्मीय प्रार्थना सभा व त्यानंतर सामुदायिक प्रार्थना होईल.बुधवारी बारा ऑक्टोबरला सकाळी परिसर सफाई,ध्यान व दुपारी बारा वाजता काला कीर्तन होणार आहे.या सर्व उपक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन महोत्सव समितीने केले आहे.