देवळीत दारू विक्रेत्याकडून पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांची गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई
साहसिक न्युज24
प्रमोद पाणबुडे/वर्धा:
देशाचा चौथा स्तंभ मानल्या जाण्याऱ्या पत्रकारांवार हल्ला होणे व जीवे मारण्याची धमकी देणे फार चिंतेचा विषय होत आहे.देवळी शहरातील आंबेडकर नगर परिसरात राहणारेमोठया प्रमाणात अवैद्य देशी दारू,मोहाची दारू,गांजा विकणारे आणी मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण करणारे,तडीपार शहारुख सांडे,रज्जत सांडे,गोलू सांडे व त्यांची बहीण यांनी दैनिक साहसीक व न्यूज 24 चे पत्रकार सागर झोरे वय (30) रा.देवळी तो चित्रपट निर्माता विलास गाडगे यांच्या ऑफिस मध्ये काम करीत असताना तू दारू बद्दलच्या बातम्या का टाकल्या म्हणून आमचे धंदे बंद पडले या कारणाने अश्विल भाषेत शिव्या देत,दरवाजाला लाथा मारून तोडवण्याचा प्रयत्न करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करुण जीवे मारण्याची धमकी दिली अशातच पत्रकाराने सावधगिरी बाळगून कंट्रोल 112 या मदत केंद्राला कॉल करून सदर घटना त्वरित सांगून मदत मागितली, मदत मिळाली असता देवळी पोलीस स्टेशनला याबाबतची तक्रार दिली . आरोपी विरोधात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कार्यवाही व्हायला पाहिजे होती परंतु ” माल सुताई ” मुळे अपेक्षित कार्यवाही झाली नाही. या बाबतची तक्रार मा.मुख्यमंत्री आणी गृहमंत्री यांना सुद्धा फिर्यादी पत्रकार तसेच पत्रकार समिती मार्फत देण्यात येणार आहे.वर्धा पोलीस अधिक्षक यांनी या गंभीर बाबी कडे लक्ष देण्याची फार गरज आहे.आरोपीविरोधात भा.द.वी.नुसार 504/506 कलमानी एन सी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास देवळी पोलीस करीत आहे.