पंचधारा धरणाच्या घोगऱ्यात १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

0

साहसिक न्युज24
गजेंद्र डोंगरे / सेलू:
तालुक्यातील रिधोरा येथील पंचधारा धरणाच्या धोगऱ्या झरन्यात आज दुपारी अडीच च्या सुमारास एकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
मृतकाचे नाव राज विजय लांबसोंगे वय 17 वर्षे रा.फुलफैल वर्धा असे आहे.मृतक राज आपल्या दोन मित्रासह रिधोरा येथील पंचधारा धरणावर फिरायला आला होता.या धरणाच्या मागील भागात असलेल्या घोगरा या डबक्यात त्यांना पोहण्याचा मोह झाला. आणि मृतक राज ने पोहण्यासाठी त्यात उडी घेतली. आणि यातच डुबून त्याचा मृत्यू झाला.
या ठिकाणी कोणतीच सुरक्षा व्यवस्था नसल्याने या ठिकाणी दरवर्षी मृत्यूची शृंखलाच असते.
घटनेची माहिती मिळताच सेलू पोलीस स्टेशनचे पीएसआय कंगाले व अनिकेत कोल्हे यांनी भेट देत घटनास्थळाचा पंचनामा केला व प्रेत शवविच्छेदसाठी मुतदेह रुग्णालयात पाठविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!