श्री संत खटेश्वर महाराज पुण्यतिथी महोत्सव सोहळा आज पासून प्रारंभ
साहसिक न्युज24
देवळी /सागर झोरे:
श्री संत खटेश्वर महाराज पुण्यतिथी महोत्सव आज दिनांक ५ ते ११ नोव्हेंबर पर्यंत श्री खटेश्वर महाराज देवस्थान मध्ये पुण्यतिथी महाउत्सव सोहळा सुरू होत असून संपन्न होत आहे.यावेळी दररोज पहाटे ४ ते ६ पर्यंत काकड आरती,सकाळी ७ ते ८ पर्यंत श्री संत खटेश्वर महाराज चरित्र वाचन,आणि सकाळी ९ ते ११ पर्यंत भागवत कथा,दुपारी २ ते ४ वारकरी महिला मंडळाचे भजन,सायंकाळी ४ ते ५ हरिपाठ,व रात्री ६ ते ९ भागवत कथेचे प्रयोजन करण्यात आलेले आहे. हरी भक्त ह.भ.प. प्रकाश महाराज चंदनखेडे यांचे भागवत कथा प्रवचन होईल सोबत काकड आरती व हरिपाठ संच ह.भ.प वैभव महाराज साटोणे, ह भ प दीपक महाराज सोनवणे, ह भ प वाल्मिक महाराज गजबे, ह भ प सचिन महाराज रणदिवे हे सोबत राहील नोव्हेंबर ला काला दहीहंडीचे दिंडी सोहळा व महाप्रसाद आयोजन करण्यात आलेले आहे. शनिवार १२ नोव्हेंबर ला दुपारी २ च्या नंतर देवळी शहरातून भव्य शोभा यात्रा काढण्यात येईल असे कार्यक्रमाचे मुख्य आयोजक दिनेश क्षीरसागर यांनी अशी माहिती दिली.तसेच समस्थ गावकऱ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे खटेश्वर महाराज पुण्यतिथी महोत्सव समितीने केली आहे.