दुचाकी अपघातात २५ वर्षीय तरूणाचा मृत्यू
देवळी /सागर झोरे :
देवळी येथील रहिवासी हर्षल दिवाकर भट वय २५ वर्ष राहणार खटेश्वर मंदिर जवळ देवळी दुचाकी क्रमांक एम एच ३२ ऐ.जी ७८९४ (शाईन कंपनीची दुचाकी वाहन) या दुचाकी वाहनाने पुलाला धडक दिल्याने तो गाडी सहित पुलाखाली गेला व जागीच ठार झाला.या घटनेची माहिती मिळताच देवळी पोलिसांनी पंचनामा करून मृतकाचे शरीर श्ववच्छदनाकरिता वर्धा येथील शासकीय रुग्णालयात पाठविले.
मिळालेल्या माहितीनुसार हर्षल दिवाकर भट हा ४ नोव्हेंबर रोजी आपल्या आईला सांगून गेला की मी इलेक्ट्रिक कामाचे पैसे आणण्याकरिता आपल्या मित्रासोबत कळंब ला चाललेलो आहे.परंतु रात्र झाली तरीही तो परत घरी आला नाही त्यामुळे घरच्यांना काळजी वाटू लागली त्याच्या नातेवाईकांनी सोबत गेलेल्या मित्राला विचारणा केली असता त्यांनी सांगितले की तो आणि मी रात्री कळंब वरून परत येत होतो परंतु इसापूर जवळ आमच्या दुचाकी वाहनाचे पेट्रोल संपले त्यामुळे आम्ही दुचाकी ला धक्का मारत इसापूर जवळील तडस यांच्या पेट्रोल पंपा वरती आलो परंतु तडस यांच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल नसल्यामुळे हर्षल ने दुचाकी झुकवून तू थांब मी समोरच्या पंपावरून पेट्रोल टाकून येतो व त्याने दुचाकी झुकवून गाडी चालू केली व एकटाच समोर निघून गेला तो बराच वेळ आला नाही म्हणून मी परत वापस आलो.
हे सर्व प्रकरण ऐकल्यानंतर मृतकाच्या कुटुंबीयांनी देवळी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली त्यानंतर शिरपूर वरून येणाऱ्या ऐका दुचाकी धारकांनी पोलीस स्टेशनला सांगितले की पुलाखाली एक इसम दुचाकी सहित पडून आहे माहिती मिळताच देवळी पोलिसांनी तिथे पोहोचून पाहणी केली असता हर्षल भट हा मृत्यू अवस्थेत आढळला देवळी पोलिसांनी आकस्मत गुन्ह्याची नोंद करून पुढील तपास देवळी पोलीस स्टेशन करीत आहे.