बोटोणा शेतशिवारात बिबटयाच्या हल्ल्यात गाय ठार
प्रतिनिधी/ आर्वी:
तळेगाव वनपरीक्षेत्र अंतरंगत येणाऱ्या बोटोणा गावाच्या धानोरा शेतशिवारात गाईच्या कळपातील एका गाईवर बिबटया नें हल्ला चढवीला त्यात गाय ठार झाली. ही घटना दि.४जुलै रोजी संध्याकाळी ५वाजता घडली.
सविस्तर असें कि, तळेगाव (शा. प.) वनपरीक्षेत्र मध्य येणाऱ्या बोटोणा येथे शेतकरी संजय गिरामकर यांच्या कडे शेती आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन हा व्यवसाय आहे. त्यांच्या कडे गाईचा कळप असून तो धानोरा शेटशीवरतील जंगलात चराई साठी जात असतो. त्याच परिसरात बिबट यांचा वावर आहे. अधून मधून तो गाईच्या कालपावर हल्ला करतो. दिनाक ४ जुलै रोजी कळप चारत असताना बिबट यांनी काळापातील एका गाईवर हल्ला चढवीला आणि त्यात गाईला जीवाणीशी ठार केले. हा सर्व प्रकार गुराखी यांनी डोळ्यातून पाहिला. यां घटनेची माहिती वनविभागाचे सोटगीर यांना दिली. पंचनामा करून आर्थिक मदत दिली जाईल असें शेतकऱ्यांना सांगितले.
बिबट्या चा बंदोबस्त करावा अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.
सोबत फोटो