तो तेरा बेटा लंबा जायेगा… शाहरुख खानलाही घाबरवण्याचा प्रयत्न; नवाब मलिक यांचा गौप्यस्फोट
मुंबई: आर्यन खानला अटक केल्यानंतर मी या प्रकरणाची पोलखोल करण्यास सुरुवात केली. त्यामुळे एनसीबीचे धाबे दणाणले. त्यानंतर अभिनेता शाहरुख खानलाही घाबरवण्याचे प्रयत्न झाले. नवाब मलिक बोलना बंद नही करेगा तो तेरा बेटा लंबा जायेगा, अशा शब्दात शाहरुखला घाबरवलं गेलं, असा दावा मलिक यांनी केला.
नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आर्यन प्रकरणी एनसीबीची पोलखोल केली. आर्यन खानला अटक केल्यानंतर मी एनसीबीची पोलखोल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर एनसीबीकडून शाहरुख खानला घाबरवण्याचं काम केलं गेलं. नवाब मलिकने बोलायचं थांबवलं नाही तर तुझा मुलगा दीर्घकाळासाठी आत जाईल, अशा शब्दात शाहरुखला घाबरवलं गेलं होतं, असा दावा मलिक यांनी केला. पडद्यामागे काय होत आहे हे मला माहीत नाही. वानखेडे कुणाला फोन करत आहे हे मी नंतर मी उघड करेन. महिलांनाही धमकावलं जात आहे, त्याचीही माहिती मी उघड करेन, असं मलिक म्हणाले.
पीडितांनी घाबरू नये, समोर येऊन माहिती द्यावी
आता पूजा ददलानीचं प्रकरण यात आलं. तुम्हीही 50 लाख रुपये दिल्याने तुम्हीही आरोपी व्हाल असं त्यांना घाबवरलं जात आहे. पण तुम्ही पीडित आहात त्यामुळे पूजा ददलानीने घाबरू नये, असं आवाहन मलिक यांनी केलं. तसेच आतापर्यंत झालेल्या धाडीत ज्यांच्या ज्यांच्याकडून पैसे उकळण्यात आले आहेत. त्या सर्व लोकांनी पुढे यावं आणि एनसीबीची पोलखोल करावी. कुणीही घाबरू नये. तुम्ही पीडित आहात. त्यामुळे उघडपणे समोर या, असं आवानही त्यांनी केलं.
कंबोज वानखेडेंचा साथीदार
आर्यन खानप्रकरणी 18 कोटीत डील झाली होती. 50 लाख रुपये उचललेही होते. पण एका सेल्फीने सर्व खेळ बिघडवला. मोहित कंबोज किडनॅपिंगचा मास्टरमाइंड आहे. खंडणीवसूलीत मोहित कंबोज वानखेडेंचा साथीदार आहे, असा दावाही त्यांनी केला.
काशिफ खानला अटक का नाही?
यावेळी नवाब मलिक यांनी नमास्क्रे फॅशन टीव्हीच्या स्पॉन्सरचा ब्रँड स्क्रिनवर दाखवला. या पेपर रोलमध्ये ड्रग्ज घेतलं जातं अशी माहिती आहे, असं त्यांनी सांगितलं. आर्यन प्रकरणात हे सँपल हे स्टॉक सीज करण्यात आलं. मग त्याच्या मालकाला का अटक केली नाही? काशिफ खान हा त्याचा मालक. त्याचं असली नाव काशिफ मलिक खान. देशातील अनेक पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. दिल्ली कोर्टाने फरार घोषित केलं आहे. समीर वानखेडेंचा तो साथीदार आहे. गोव्यात त्याची बरीच संपत्ती आहे. फॅशन टीव्हीचा इंडिया हेड असल्याचं तो सांगत आहे. तो पार्टीत नाचत होता. त्याला अटक का केली नाही? असा सवाल त्यांनी केला.
अस्लम शेख यांनाही फोर्स केला
पालकमंत्री अस्लम शेख यांना पार्टीत येण्यासाठी काशिफ खान फोर्स करत होता. मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या नेत्यांना पार्टीत घेऊन जाणार होता. तो अस्लम शेखला का घेऊन जाणार होता. मंत्र्यांच्या मुलांना का ट्रॅप करत होता. कट रचून ड्रग्जचा खेळ सरकार चालवत आहे अशी बदनामी करण्याचा डाव होता, असा दावा करतानाच अस्लम शेखही हे सुद्धा या प्रकरणाची माहिती देतीलच. आता या प्रकरणाची मुंबईच्या एसआयटीनेही चौकशी केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.