वर्धा जिल्ह्यात परिणाम हेल्थ ‘केअर’ चा भंडाफोड होताच तोतया अमनसिंग व चमनसिंग बंधूंनी आपला मोर्चा वळविला अमरावती जिल्ह्यात
साहसिक वृत्त / वर्धा :
मागील ८ दिवसांपासून परिणाम हेल्थ केअर प्रा. लि. या कंपनीचा दैनिक साहसिक व साहसिक न्युज २४ चॅनलनी भंडाफोड करताच या कंपनीचा एजंट उपजिल्हा सामान्य रुग्णालय हिंगणघाट येथील नेत्रतज्ञ डॉ. संजय बोबडे यांनी परिणाम हेल्थ केअर चे प्रोडक्ट विकण्यास तसेच नकली रुग्ण तपासण्यास विरोध केला यामुळे दर १५ दिवसांनी होणारा परिणाम हेल्थ केअर प्रा. लि. कंपनीचा धांगडधिंगा डान्स कार्यक्रम हॉटेल गणराज मधून बंद केला असून आता वर्धा जिल्हा सोडून या कंपनीचे सि.ई.ओ. अमनसिंग व त्याचा भाऊ विनोदसिंग या दोघांनी वर्धा जिल्ह्यात परिणाम हेल्थ केअर चा माल विकण्यास मनाई केली असून मराठवाडा येथून आयात केलेला व सध्या अमरावती जिल्ह्यात वास्तव्यास असलेला गणेश जेगडे याला अमरावती व वर्धा या जिल्ह्यातील एजंट ला बेवकुफ बनविणार्या ग्राहकाला शोधून त्याला परिणाम हेल्थ केअर मध्ये आणून नकली औषधी विकण्याची जबाबदारी दिली आहे. राकड व अन्य मटेरियल तयार करुन परिणाम हेल्थ केअर प्रा.लि. कंपनीने आजपर्यंत लाखो ग्राहकांना उल्लू बनविले आहे. अमरावती येथील गणेश जेगडे याने आजपर्यंत १५ ते २० हजार लोकांना परिणाम हेल्थ केअर प्रा.लि. या धंद्यात उतरवून स्वत: लखपती बनला आहे. मार्केटिंगमध्ये २०० रुपयाला विकली जाणारी औषधी १२०० रुपयाला ग्राहकांचे माथी मारली जात आहे. परिणाम हेल्थ केअर प्रा. लि. चे नागपूर येथील ऑफिस एका भाड्याचे घरातून चालविण्यात येत आहे. मागील ४ वर्षापासून नागपूर येथील ब्राँच ऑफिसला बोर्ड सुद्धा लावला नाही. महाराष्ट्र शासनाची परवानगी आवश्यक आहे. ती नाही. कंपनीचे स्वत:चे प्रोफाईल सुद्धा नाही. कंपनीला सदरची औषधी नेटवर्कींग मार्केटिंग च्या माध्यमातून विकता येत नाही. असे असताना सुद्धा दर १५ दिवसांनी महाराष्ट्रातील २०० जिल्ह्यात व १० राज्यात हा गोरखधंदा मोठ्या जोमाने सुरु आहे. चिखलदरा येथे सुद्धा सिल्वर, स्टार, गोल्ड स्टार, डायमंड स्टार, क्राऊन स्टार यांना बोलावून धांगडधिंगा डान्स करण्यात येवून परिणाम हेल्थ केअर ची बोगस औषधी विकून हे दलाल, एजंट मौज मज्जा करीत आहे. ग्राहकांना बायो मॅग्नेट, सी बक्थोर्न कॅप्सुल, मोरींगो कॅप्सुल, नोनी ज्सूस, एलोविरा फायबर्स ज्युस, बिटग्रास ज्युस, शुगर केअर ज्युस, टुथपेस्ट, पसीएजियम हस्क कॅप्सुल व अन्य ५५ प्रकारच्या नकली औषधी विकण्याच्या गोरख धंद्याचा दै. साहसिक वृत्तपत्रांनी भंडाफोड करताच परिणाम हेल्थ केअर प्रा.लि. चे दलाल व एजंट डॉ. संजय बोबडे व त्यांची पत्नी यांनी आपला प्रभार लोकांना मोठ्या प्रमाणात टोपी घालणार्या गणेश जेगडे कडे दिला आहे. दै. साहसिकची चमू आता अमरावती जिल्ह्यात जावून गणेश जेगडे च्या डान्स कार्यक्रमाची संपुर्ण माहिती वाचकांना उपलब्ध करुन देण्यात येईल.