वंचित बहुजन महिला आघाडीच्या उपाध्यक्ष नीता गणवीर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण
साहसिक न्युज24
प्रतिनिधी/ वर्धा:
निसर्ग मानवाला खूप काही देत असतो याची जाण ठेवून, निसर्गाचं देणं आहे या कृतज्ञतेच्या भावनेतून प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी आपापल्या क्षेत्रात वृक्षारोपण करून किमान एक तरी झाड लावावे, असे आवाहन
वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष नीता गणवीर यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करताना केले . यानिमित्त वर्ध्यातील सिव्हिल लाईन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष विजय गवळी यांनी वृक्ष लागवड ही एक व्यापक चळवळ झाली असून, जगा, जगवा अन् जगू दया हा जीवन मंत्र आत्मसात करुन वृक्षारोपण मोहिमेत सामाजिक बांधिलकीतून सहभागी व्हावे, असेही ते म्हणाले. या उपक्रमात वंचित महिला आघाडीच्या हिंरा मांढरे, कोमल रामटेके, गौरी टेंभरे तसेच शेखर धनवीज , अरविंद भगत, राजू थूल , प्रदीप भगत यासह इतरही कार्यकर्ते उपस्थित होते.