देवळीत दहीहंडी स्पर्धेचे आयोजन १७ ला,बजरंग दल व विश्व हिंदू परिषदने केले आयोजन

0

सहासिक न्यूज-24
सागर झोरे/देवळी

श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाच्या जन्म झाला त्यामुळे त्या अष्टमीला हा जन्मदिवस उत्साहाने साजरा केला जात असतो. देवळी शहरात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त १७ सप्टेंबर सलग नव्या वर्षी बजरंग दल व विश्व हिंदू परिषद यांच्या द्वारा आयोजित दहीहंडी स्पर्धा १७ सप्टेंबर रोजी घेण्यात येत आहे. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक खा. रामदास तडस,मुख्य अतिथी म्हणून डॉ.उदय मेघे,उद्योगपती मोहन बाबू अग्रवाल तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश बकाने यावेळी प्रामुख्याने उपस्थित असतील या दहीहंडीच्या मडका फोड स्पर्धेचे प्रथम पुरस्कार ६१,हजार १११ रोख,व द्वितीय पुरस्कार ३५,हजार १११ रोख,असे एकूण १,लाख ५०,हजार रु चे बक्षीस राहील स्पर्धेत सहभागी प्रत्येक चमूला प्रोत्साहन पुरस्कार दिल्या जाईल या स्पर्धेची प्रवेश फी १,हजार १०० रु राहील.
या स्पर्धेला सफलतार्थ दिनेश क्षीरसागर,गोल्डी बग्गा,गजानन महल्ले,मोहन जोशी, अनिल शिरसागर,संजय कामडी, प्रवीण तेलरांधे,गजानन पोटदुखे, गजानन मेंडूले,अमोल गोडबोले, भारत पांडे,आदी कार्यकर्ते प्रयत्न करणार आहे तसेच प्रवेश फी तसेच स्पर्धेसंबंधी कोणतीही तक्रार असल्यास वरील कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा अशी माहिती बजरंग दलचे गजानन महल्ले यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!