पळसगाव येथील तरुणीचा बुटीबोरी येथे अपघाती निधन.
मृतक निकिता चौधरी रां.पळसगाव
देवळी:तालुक्यातील पळसगाव येथील रहिवाशी निकिता प्रमोदराव चौधरी वय २३ वर्ष हिचा नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथे शुक्रवारी संध्याकाळी अपघाती निधन झाले.
निकिता चौधरी ही मागील दोन महिन्यांपासून बुटीबोरी येथील एका बियाण्याच्या कंपनीमध्ये काम करीत होती निकिताने शेतकरी शाळा सेलसुरा येथून कृषी क्षेत्राचा डिप्लोमा केलेला होता.निकिता व तिची मैत्रीण कंपनीच्या जवळ एका गावामध्ये रूम किरायाने करून राहत होते.आता पोळ्याच्या दिवशी ती आपल्या घरी पळसगाव ला आली असता निकिताच्या वडिलांनी पोळ्याच्याच दिवशी तिला एक नवीन स्कुटी दु चाकी घेऊन दिली होती.आणि त्याच स्कुटीनेच निकिताचे अपघात होऊन तिचा मृत्यू झाला.तिच्या परिवारामध्ये दोन बहिणी एक लहान भाऊ आई-वडील असा परिवार आहे.पळसगाव गावामध्ये तिच्या मृत्यूची बातमी कळताच शोककळा पसरलेली आहे.तिचा अंतिम संस्कार पळसगाव तिच्या राहत्या गावी शनिवारी संध्याकाळी करण्यात येईल अशी माहिती प्राप्त झालेली आहे.
सागर झोरे सहासिक न्यूज-24