अतुल वांदिले यांचा जलसमाधी आंदोलनाचा इशारा देताच पुलाच्या बांधकामाचे काम सुरू… शासनाने घेतली तात्काळ दखल…
अखेर हमदापुर सर्कल मधील पैलवानपूर गावातील नाल्यावरील पुलाच्या प्रश्न कायमचा सुटला…
पैलवानपूर,शिरसगाव,चिंचोली गावात आनंदाचे वातावरण…
गावकऱ्यांनी मानले प्रदेश सरचिटणीस ‘अतुल वांदिले’ यांचे आभार….!
हिंगणघाट : हमदापूर सर्कल मधील पहेलवानपुर गावातील नाल्याच्या पूल नाला खोलीकरण दरम्यान कंत्रातदाराने तोडला असल्याने तीन गावातील शेतकऱ्यांना शेतात जाण्याचा संपर्कच तुटला होता. याबाबद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, हमदापूर सर्कल मधील नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊन पूल बांधण्याची मागणी केली होती.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी ३० तारखेला नाल्याच्या पाण्यात बसून आंदोलन करण्याच्या इशारा दिला होता. सदर इशाऱ्याचा प्रभावी परिणाम होऊन आज या पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागणीला यश आले आहे.
हमदापूर सर्कल मधील पहेलवानपुर गावातील नाल्याच्या पूल नाला खोलीकरण दरम्यान कंत्रातदाराने तोडला होता.पहेलवानपुर,शिवणगाव व चिंचोली या तिन्ही गावातील शेतकाऱ्यांच्या शेत्या नाल्याच्या पलीकडे असून या नाल्यावरती असलेल्या पुलावरून शेतकरी शेतात जाणे येणे करत होते.या नाल्याचे खोलीकरण करत असतांना नाल्यावरील सर्व ढोले कंत्राटदराने काढून टाकले.नाल्याचं काम पुर्ण झाल्यानंतर हे ढोले टाकून रस्ता पूर्ववत करून देण्याचे काम संबंधित कंत्राटदाराचे होते.मात्र या कंत्राटदाराकडून या नाल्यावरील पूल न टाकता रस्ताच ठेवण्यात आला नसल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली आहे.दहा दिवसाच्या आत या नाल्यावर ढोले टाकून शेतकऱ्यांची शेतात जाण्याची व्यवस्था न करून दिल्यास याच नाल्याच्या पाण्यात बसून आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीं पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी दिला होता.आज या पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागणीला यश आले आहे. हमदापूर सर्कल मध्ये आनंदाचे वातावरण आहे.
——————————————–
हमदापुर सर्कल मधील पैलवानपूर शिवणगाव चिंचोली या गावातील शेतकऱ्यांना शेतात ज्या पुलावरून रोज ये-जा करावं लागते तो पूल मुसळधार पावसाने पूल वाहून गेला होता. याकडे शासनाने ताबडतोब लक्ष घालून त्या पुलाचे बांधकाम दहा दिवसाच्या आत सुरू करून पूल बांधून द्यावा अन्यथा जलसमाधी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.आज या पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागणीला यश आले आहे.अतुल वांदीले प्रदेश सरचिटणीस,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.ईकबाल पहेलवान सहासिक न्यूज-24