लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघात दै देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांचा प्रवेश
राष्ट्रीय संघटन व संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती
अकोला- लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या कोरोना काळात स्थापन झालेल्या व अल्पावधीतच नावलौकिक प्राप्त करणाऱ्या पत्रकारांच्या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेत अकोला येथील दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक ,एक आक्रमक शेतकरी नेते श्री. प्रकाशभाऊ पोहरे यांचा प्रवेश झाला आहे.ते इंडीयन लॕंग्वेजेस न्यूजपेपर्स असोसिएशन (ईलना) या देशभरातील सर्वभाषिक वृत्तपत्रांच्या संपादक प्रकाशकांच्या राष्ट्रीय संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आहेत. लोकस्वातंत्र्यच्या राष्ट्रीय संघटन व संपर्क प्रमुख पदासाठी त्यांनी स्विकृती दिल्यानंतर त्यांना या सन्मानाच्या पदावर विराजमान करण्यात आले आहे.आज कान्हेरी गवळी येथील त्यांच्या वेदनंदिनी या पर्यटन स्थळांवर लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी पदाधिकाऱ्यांसह त्यांची सदिच्छा भेट घेतली.यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रदिपजी खाडे,राष्ट्रीय सचिव राजेन्द्रजी देशमुख,विजयराव बाहकर हे उपस्थित होते. प्रकाशभाऊ पोहरे यांनी आपला सभासद फॉर्म भरून लोकस्वातंत्र्यचे संघटन कार्य आणि पत्रकार कल्याणाच्या कार्यात जास्तीत जास्त सहकार्य करण्याची ईच्छा प्रगट केली. त्यांच्या या प्रवेशाबध्दल लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे पदाधिकारी आणि असंख्य पत्रकारांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
अविनाश नागदेवे सहासिक न्यूज-24 वर्धा