राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी.
सिंदी (रेल्वे) : गांधी चौक मित्र परिवारातर्फे देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५४ वी जयंती व देशाचे पूर्व प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांची ११९ वी जयंती संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
शहरातील गांधी चौक मित्र परिवारातर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला.सर्वप्रथम दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. देशाला आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांची गरज असून अहिंसेची व शांततेची गरज आहे. मात्र,आज काही समाजकटंक हेतुपुरस्सर गोडसे याला पुरुस्कृत करीत असल्याचे विचार खरेदी विक्री सहकारी संस्थेचे उपसभापती ए.सी. कलोडे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोर सोनटक्के,प्रमुख पाहुणे खविसचे उपसभापती ए.सी.कलोडे, शंकर काटोले,रामदास झिलपे,रवी राणा, सचिन लांबट,सुधीर झिलपे, गजानन खंडाळे,तान्हाजी झाडे, दिलीप बडवाईक,जगदीश बोरकुटे, प्रशांत ढोबळे,उज्वल काटोले, चंद्रशेखर चौधरी,प्रविण वाघमारे, गजानन दुर्गवार आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती
दिनेश घोडमारे सहासिक न्यूज -24 सिंदी रेल्वे