अंकिताच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या !
🔥 खटला फास्टस्ट्रेक कोर्टात चालवा.
🔥 श्री. संताजी अखिल तेली समाज संघटनेचे निवेदन सादर
सिंदी (रेल्वे) : वर्धा जिल्ह्यातील दहेगाव गोसावी येथील कु. अंकीता सतीश बाईलबोडे हिची एकतर्फी प्रेमातून तिच्या राहत्या घरी जाऊन मारेकऱ्यांनी निर्घृण हत्या केली. त्यामुळे अंकीताच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच फास्टस्ट्रेक कोर्टात खटला चालवावा या मागणीसाठी पोलीस निरीक्षक सिंदी (रेल्वे) येथील वंदना सोनूले यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकनाथ शिंदे यांना श्री. संताजी अखिल समाज संघटनेचे तालुका उपाध्यक्ष संजय कोपरकर यांच्या नेतृत्वात एक निवेदन नुकतेच देण्यात आले.
कु. अंकीता सतीश बाईलबोडे रा. दहेगांव गोसावी जवळ तुळजापूर रेल्वे स्टेशन या मुलीला रात्री ८ वाजताच्या दरम्यान तिच्या राहत्या घरी या आरोपींनी निर्घृण हत्या करण्यात आली. ही मुलगी तेली समाजाची आहे. या मुलीचा निर्घृण खून करणारे चारही आरोपी पोलिस कस्टडीत आहे. निर्ढावलेल्या मारेकऱ्यांना कश्याचाही धाक ना कायद्याची भीती, अशा मारेकऱ्यांवरती फास्टस्ट्रेक कोर्टात खटला चालवून यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी. भविष्यात अशा प्रकारच्या अपराधी प्रवृत्तीच्या मानसिक गुन्हेगारांवरती पोलिसांची वचक बसावी, म्हणुन कायदा कठोर बनवून तेली समाजाला तथा महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्याचे कार्य तत्कालीन सरकारने करावे, अशी मागणी श्री. संताजी अखिल तेली समाज संघटन सिंदी रेल्वे शहराच्या वतीने सेलू तालुका उपाध्यक्ष संजय कोपरकर यांच्या नेतृत्वात निवेदन देऊन मागणी करण्यात आली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघटनेचे निवेदन स्वीकारून तेली समाजाच्या एका निष्पाप मुलीवरती होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडावी. तथा संबंधीत दोषींवर फास्टट्रैक कोर्टात खटला चालवून लवकरात लवकर न्याय मिळवुन देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी तसेच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी त्यांच्या राज्यामध्ये अपराध्यांच्या घरावरती बुलडोझर फिरवीला. त्याच पद्धतीने आपल्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आरोपींच्या घरावर बुलडोझर फिरवून अंकीताच्या परिवाराला न्याय देऊन जनतेचा रोष शांत करावा. या आशयाचे निवेदन श्री. संताजी तेली समाज संघटना सिंदीच्या वतीने पोलीस निरीक्षक सिंदी वंदना सोनूले यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले आहे. याप्रसंगी सेलु तालुका उपाध्यक्ष संजय कोपरकर, किशोर डकरे, तुळशीराम झिलपे, गणेश वरघने, सुरेश लाजुरकर, बबन फटींग आदी श्री. संताजी अखिल तेली समाज संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिनेश घोडमारे सहासिक न्यूज-24