महाराष्ट्र सॉफ्ट टेनिस संघात बुलढाणा जिल्ह्यातील दोन खेळाडूंची निवड.
खेळाडू सोनल खर्च
विजयवाडा आंध्रप्रदेश येथे होणार राष्ट्रीय स्पर्धा
१८ वी ज्युनियर राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेणाऱ्या महाराष्ट्र राज्य संघात बुलढाणा जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशन यांचे खेळाडूची महाराष्ट्र संघात निवड झालेली आहे सदर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा दिनांक १५ ते १९ ऑक्टोबर २०२३ दरम्यान इंदिरा गांधी स्टेडियम विजयवाडा आंध्र प्रदेश संपन्न होणार आहे. ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ लातूर येथे संपन्न झालेल्या ज्युनिअर राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत आपल्या नेत्रदीपक कामगिरी करीत क्रिडा क्षेत्राचे हब असलेल्या मलकापूर शहरातील खेळाडूं व सॉफ्ट टेनिस स्पोर्ट्स असोसिएशन बुलढाणा व तालुका क्रिडा संकुल मलकापूरचे खेळाडू कु.सुष्ट्री अतुल होले कु.सोनल गणेश खर्च या खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड झालेली आहे सदर खेळाडूंनी बुलडाणा जिल्हाचा नावलौकिक महाराष्ट्रतात वाढविला असुन या खेळाडूंना विजय पळसकर क्रिडा संघटक व मार्गदर्शक सचिव सॉफ्ट टेनिस स्पोर्ट्स असोसिएशन बुलढाणा यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभत आहे.
या महिन्यात लातूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकूण ४० संघांनी सहभाग घेतला असून या स्पर्धेतुन या खेळाडूची महाराष्ट्र संघात निवड झालेली असून निवड झालेल्या कु सुष्ट्री होले आतापर्यंत दोन राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला असून तसेच यापूर्वी कु.सोनल खर्चे अहमदाबाद येथील सबज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत तसेच अहमदाबाद येथे नुकत्याच सपन्न झालेल्या फेडरेशन कप मध्ये महाराष्ट्र संघाला कांस्यपदक मिळविण्याऱ्या महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधत्व केले तसेच लातुर येथे राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत बुलढाणा जिल्हा मुलीच्या संघाला सुवर्णपदक पटकावणाऱ्या बुलढाणा जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची सचिव नामदेव शिरगावकर सॉफ्ट टेनिस असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष.सुनील पूर्णपात्रे सचिव.रवींद्र सोनवणे उपाध्यक्ष दीपक आर्डे तसेच जिल्हा क्रिडाअधिकारी बुलढाणा महाणकर तालुका क्रिडाअधिकारी लक्ष्मीशंकर यादव सॉफ्ट टेनिस स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष संतोष बोरगांवकर कार्याध्यक्ष राजेश महाजन सचिव विजय पळसकर कोषाध्यक्ष राजेश्वर खंगार विनोदशेठ राजदेव चंद्रकांत साळुंखे आदींनी महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल खेळाडूंना शुभेच्छा देऊन अभिनंदन करून राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.
खेळाडू सृष्टी होले
सागर राऊत सहासिक न्यूज-24