इंडो ग्लोबल सोशल सर्विस सोसायटी विस्तार प्रकलपाच्या माध्यमातून तळणी भागवत येथे जागतिक अन्न दिवस साजरा करण्यात आला.
इंडो ग्लोबल सोशल सर्विस सोसायटी व विस्तार प्रक्लप अंतर्गत देवळी तालुक्यातील २५ गावामध्ये विस्तार प्रकल्प राबविण्यात येत आहे.दर वर्षी प्रमाणे विस्तार प्रकलपा प्रकल्पा अंतर्गत १६ ऑक्टबर रोजी जागतिक अन्न दिवस साजरा केला जातो.जागतिक अन्न दिवस साजरा करण्याचे महत्व म्हणजे अन्न सुरक्षा व पोष्टिक आहाराची गरज या बाबत महिलांना जागृत करणे त्यांना तृण धान्याचे महत्व समजून सांगणे.
या वर्षी विस्तार प्रकल्प अंतर्गत तळणी भागवत येथे जागतिक अन्न दिवस व किसान महिला दिवस निमित्याने तृण धान्य मूल्यवरधित पदार्थ कार्यशालेचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व विस्तार प्रकल्पाचे होत असलेले कार्य रुरल मोबिलाझर प्रीतम ईखे यांनी सांगितले. कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून आलेल्या मंजूताई करपती यांनी तृण धान्यपासून पोष्ठिक पदार्थ बनवून त्याचे महत्व सर्व महिलांना समजून सांगितले. तसेच वैशाली सागोले यांनी भरड धान्य विषयी मार्गदर्शन केले व शीला ढाक यांनी पुरक आहार व अन्न दिवसा बद्दल मार्गदर्शन केले. तळणी भा. येथील अंगणवाडी सेविका अनिता दवाल यांनी कुपोषण व पोष्ठीक आहार बद्दल महिला मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला तळणी भा,हिरापुर, कोळना घोडेगाव , चोंडी येथील महिला उपस्थित होत्या.कार्यक्रमाला यसस्वी रित्या पार पाडन्या करिता गाव स्वयंसेवक हनुमंत पचारे, सविता टामटे, अर्चना बिरे व कांचन चांदणखेडे यांनी सहकार्य केले.
सागर झोरे सहासिक न्यूज -24 देवळी