दारोडा टोल नाक्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धडक, टोल नाक्यावर स्थानिक नागरिकांना उद्धट वागणुक.
टोल नाक्यापासून 10 किलोमिटर पर्यंत गावातील नागरिकांना मोफत टोल करा
राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात स्थानिक नागरिकांनी दिली टोल नाक्यावर धडक
सिंदी (रेल्वे) : दारोडा टोल नाक्यावर स्थानिक नागरिकांचा विविध समस्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात धडक देत निवेदन देण्यात आले.
दारोडा टोल नाक्यावर मॅनेजरची स्थानिक नागरिकांना उद्धट वागणुकीबाबत प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्याकडे अनेक स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या. दारोडा टोल नाक्यावर अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात धडक देत टोल मॅनेजरला जाब विचारण्यात आला. टोल नाक्यापासून ते 10 किलोमीटर पर्यंत गावातील नागरिकांना टोल माफ करण्यात यावा, टोल वर स्थानिक नागरिकांना रोजगार देण्यात यावा, दारोडा गावाजवळील अप्रोच रोड तात्काळ बनविण्यात यावा तसेच दारोडा गावाजवळील पुलावर लाईट लावण्यात यावे, अशी मागणी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात स्थानिक गावकऱ्यांनी टोल मॅनेजर यांना निवेदन दिले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, अमोल बोरकर, युवक जिल्हा उपाध्यक्ष गुरुद्यालसिंग जुनी, युवक जिल्हा सरचिटणीस अमोल चंदनखेडे, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष जावेद मिर्झा, तालुका अध्यक्ष राहुल वानखेडे, उपसरपंच ठेभां प्रवीण कलोडे, माजी सरपंच आफताब कुरेशी, उपसरपंच निलेश नांदे, सुनील भुते, प्रवीण श्रीवास्तव, किशोर चांभारे, राजू मेसेकर, भास्कर कोसुरकर, विजय ढोक, राजू सराटे, बबनराव रघाटाटे, किशनाजी मातकर, मोहन साठोणे, विठ्ठलराव उगेमुगे, रवी सांमोडे, रुपेश सासरकर, समीर पोहाणे, समीर धोगंडे, रघुनाथजी घिये, प्रफुल बोरकर, निखिल थुल, सागर बुरांडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दारोडा टोल नाक्यावरून शिक्षक, शेतकरी बांधव, व्यावसायिक अनेक नागरीक या टोल वरून दररोज ये-जा करीत असतात. टोल मॅनेजर श्रीवास स्थानिक नागरिकांना उद्धट वागणूक देतात अशा अनेक नागरिकांचा तक्रारी माझा कडे असून म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे टोल वर धडक देण्यात आली. दुसऱ्या राज्यातील अधिकारी येऊन स्थानिक शेतकरी बांधवाना दादागिरी करत असेल तर ते आम्ही खपऊन घेणार नाही. टोल मॅनेजर श्रीवास याला दहा दिवसांच्या आत ट्रान्सफर करा तसेच टोल परिसरातील दहा किलोमीटर पर्यंत गावातील नागरिकांना मोफत टोल करा. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तीव्र आंदोलन करेल.
अतुल वांदिले
प्रदेश सरचिटणीस
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीदिनेश घोडमारे साहसिक न्यूज -24