स्व. रमाबाई वझुरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ 200 दिव्यांचा संकल्प.
🔥माझी आजी एक वैराग्याची प्रतीक होती – अजय वझुरकर
सिंदी (रेल्वे) (वा).:- माझी आजी एक वैराग्याची प्रतीक होती. त्यांनी आम्हाला संस्कारमय जीवन शिकवले. योग्य संस्कारांचा अनमोल ठेवा बालवयातच देणे आवश्यक असते, या दृष्टिकोनातून स्काऊट गाईड, रोव्हर रेंजर व राष्ट्रीय सेवा योजना हे कार्य निरंतर करत असून दीपसंस्कार यासारख्या उपक्रमातून उत्कृष्ट समाज घडत आहे.” असे प्रतिपादन अजय वझुरकर यांनी केसरीमल नगर विद्यालय तथा स्व सौ रमाबाई वझुरकर नगर कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने 8 नोव्हेंबरला स्व सौ रमाबाई वझुरकर स्मृती प्रित्यर्थ आयोजित दीप संस्कार कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नगर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अतुल टालाटुले तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे कोषाध्यक्ष अशोक दवंडे, सहसचिव नीता टालाटुले, संचालिका राधिका देशपांडे, प्राचार्य विलास येखंडे व पर्यवेक्षक अनिल चांदेकर प्रामुख्याने उपस्थित होते.
‘प्रत्येक हृदयात विवेकाचा दीप चेतविण्यासाठी आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित आणण्यासाठी दिवाळी साजरी केली जाते. भारतीय संस्कृतीत दिव्याचे अनन्य साधारण महत्त्व आहे. हा ज्ञानाचा, प्रकाशाचा प्रतीक असून अंधार व अज्ञानावर विजय म्हणून प्रतीत होतो’ असे मत प्रमुख अतिथी अशोक दवंडे यांनी व्यक्त केले.
नको फटाक्यांची धूळ आणि धूर, दिव्यांची रोषणाई करूया भरपूर, आवाज आणि धुराच्या फटाक्यांना द्या नकार, प्रदूषण मुक्त वातावरणाचा करूया स्वीकार, आता आम्ही जागे होणार नाही, तर उद्या स्वच्छ वायू राहणार नाही असे मत प्रास्ताविकातून रासेयो जिल्हा समन्वयक प्रा रवींद्र गुजरकर यांनी दीप संस्काराचे महत्त्व सांगताना केले. तर भारतीय संस्कृतीत दिवाळीचे महत्त्व व दीप म्हणजे काय यावर अध्यापक विलास कोरान्ने यांनी प्रकाश टाकला.
याप्रसंगी विद्यार्थ्यांकरिता दीप सजावट स्पर्धेचे आयोजन तीन विभागात करण्यात आले. यात प्राथमिक विभागात हितेश्वरी सराटे, काव्या जांभुळकर व दृष्टी ईवनाथे यांनी प्रथम तीन क्रमांक प्राप्त केले. मिडलस्कूल विभागात डुलेश्वरी निमजे, भाविका बावणे, नेहा नागरीकर व गौरी कातोरे तर हायस्कूल विभागात केशर नानवटकर, वेदिका पालीवाल, देवांशी सोनटक्के, खुशबू हजारे, भावना घोडे व कृतिका खेकडे यांनी प्रथम तीन क्रमांक प्राप्त केले. स्पर्धेचे आयोजन शिक्षिका कविता सातपुते, गाईड कॅप्टन पुष्पा नंदनवार, प्रियंका भगत, स्काऊट मास्टर गजेंद्र गिरडकर, संजय ढगे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन वर्षा गवारले तर आभार प्रदर्शन अंबरनाथ नानवटकर यांनी केले.
याप्रसंगी माजी शिक्षक हरिभाऊ देशपांडे, गिरीश वझुरकर, विद्या वझुरकर, संजीवनी वझुरकर, रेणुका वझुरकर व अमेय वझुरकर आवर्जून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, स्काऊट गाईड रोव्हर रेंजर विद्यार्थी तसेच राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या स्वयंसेवकांनी अथकपरिश्रम परिश् केले.
दिनेश घोडमारे साहसिक न्यूज -24