अवैध दारू वाहतूक प्रकरणी बार मालकावर गुन्हा दाखल.

0

🔥सिंदी पोलिसांची कारवाई                 🔥दोन आरोपींना अटक                   🔥 48 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

सिंदी (रेल्वे) : कांढळी-उमरा मार्गावर अवैद्यरीत्या दारूची वाहतूक केल्याप्रकरणी दारू विक्रेत्यांसह बारमालक मनोज जयस्वालवर सिंदी पोलिसांनी कारवाई केली आहे. आकाश वसंत बावणे (27) व कुंडलिक कवडू नागोसे (49) दोन्ही राहणार पळसगाव रोड सिंदी (रेल्वे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून एकूण 48 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सिंदी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सिंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 12 नोव्हेंबरच्या रात्री मुखबिराकडून माहिती मिळाली की, गोवर्धन बार, सोनेगाव (लोधी) येथून अवैद्यपणे मौजा कांढळी-उमरा मार्गावर अवैध दारू विक्रेता आकाश वसंत बावणे व कुंडलिक कवडू नागोसे हे दोघे एक जुनी वापरातील हिरो होंडा कंपनीची सी.डी. 100 मोटरसायकल क्रमांक MH-32-D-89 किंमत 12 हजार रुपये याने अवैद्यरीत्या दारूची वाहतूक करीत आहे. अशा प्राप्त खबरीवरून कांढळी-उमरा मार्गावर पोलिसांनी नाकाबंदी करून पंचासमक्ष आकाश वसंत बावणे व कुंडलिक कवडू नागोसे यांना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता 5 खरड्याच्या खोक्यांमध्ये 180 एम एलच्या देशी दारूने भरून असलेल्या सीलबंद लावणी कंपनीच्या एकूण 240 शीश्या प्रति मग 150 रुपये प्रमाणे एकूण 36 हजार रुपये असा एकूण 48 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सिंदी पोलिसांनी आरोपी आकाश वसंत बावणे व कुंडलिक कवडू नागोसे यांना अटक केली असून बारमालक मनोज जयस्वालसह दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे यांच्या आदेशानुसार सिंदी ठाणेदार वंदना सोनुले यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राजू सोनपितरे, स्मिता बोरकर, आनंद भस्मे, रवी मोरे, अमोल पिंपळकर, सचिन उईके, उमेश खामनकर यांनी केली आहे.

दिनेश घोडमारे साहसिक न्यूज-24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!