बिरसा मुंडानी मरण पत्करले, पण स्वाभिमान सोडला नाही.
समाज सेवक किरण ठाकरे यांचे प्रतिपादन
देवळी : तालुक्यातील सोनेगाव(आबाजी)येथे जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी इंग्रजांनी अन्याय करताना गरीब श्रीमंत पाहिले नाही आदिवासी समाज हा जंगलात राहून निसर्गाच्या साधन सम्पतीवर जगत होता, पण त्या नैसर्गिक साधन सम्पतीवर इंग्रजांनी कब्जा केला होता, त्यामुळे आदिवासींच्या उपजीविकेची समस्या निर्माण झाली होती. अशा प्रकारच्या अन्यायाविरुद्धत जननायक बिरसा मुंडा यांनी धनुष्यबाण हे नैसर्गिक शस्त्र हातात घेऊन इंग्रजांविरोधात लढा दिला. त्यांनी लोकांमध्ये स्वाभिमान व देशभक्तीची प्रेरणा निर्माण केली. मरण पत्करले पण त्यांनी स्वाभिमान सोडला नाही. असे विचार समाज सेवक किरण ठाकरे यांनी व्यक्त केले. तसेच संजय सयाम यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या अवघ्या२५वर्षाच्या संघर्षमय जीवनावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी अतुल कोवे,अभय मडावी,सौरभ दडांजे,निलेश नैताम,हनुमान सराटे, उमेश दडांजे,भगेश टेकाम,लक्ष्मण मडावी,अनिल कुडमते,आकाश कोरचे,दिवाकर कोवे,दिनेश पेंदाम, अंकुश कोवे,क्रिश आत्राम,सतीश परतेकी,सचिन पेंदाम यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.
सागर झोरे साहसिक न्यूज -24