देवळीत पथदिवे बंद काही भागात दिवस रात्र पथदिवे सुरू..
६५९ पथदिव्यांचा बंद आकडा नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष…..
देवळी नगरपरिषद प्रशासनाचे हलगर्जी धोरण व प्रत्येक आवश्यक कामाकडे दुर्लक्ष झाले असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
दीपावली सारख्या दीपोत्सवांच्या सणाला देवळीतील अर्धा अधिक पथदिवे बंद असल्याने काळोख होता अजूनही दुरुस्ती झाली नसल्याने काढू आहे या उलट काही भागात दिवस रात्र पथदिवे दररोज सुरू असल्याचे पहावयास मिळत असल्याने दुर्लक्षित धोरणावर संताप व्यक्त होत आहे.
नगरपरिषदेच्या दुर्लक्षित व्यवस्थापनामुळे दैनंदिन समस्या पराकोटीला गेले आहे याकडे जिल्हा प्रशासन किंवा लोकप्रतिनिधीचे अजिबात लक्ष नाही मागील सहा महिन्यांपासून ही परिस्थिती आहे याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांची मागणी आहे.
पथदिवे देखभाल व दुरुस्तीचे कंत्राट हरियाणातील ई ई एस या कंपनीकडे होते त्यांनी ६० लाखाचे बिल आखल्यामुळे काम सोडले. या कंपनीला शासनातर्फे कंत्राट देण्यात आला होता या कंपनीचे काम सुद्धा बरोबर नव्हते फक्त बिल वसूल करणे व आतुर मातुर कामाचा त्यांचा फंडा होता बिल बरोबर मिळत नसल्याचे सांगत अधिका अधिक पथदिवे दुरुस्तच केले नाही बिल थकले म्हणून काम बंद केल्याचे यात भर पडल्याने शहरातील १ हजार ६५९ पथदिवे बंद असल्याचे सांगण्यात आले आज घडीला १८ वॅटचे १३१६ ३५ वॅटची २५१ सत्तर वॅटची १६ तसेच हाय वॅट बल ६० खांबावरील १४० वॅटची ३१८ बंद आहे.
देवळी नगर परिषदेची प्रशासक सेलूचे तहसीलदार सोनवणे यांचे कडे पदभार आहे पण अजून त्यांचे कार्यालयाकडे लक्ष नाही व देखरेख नाही मुख्याधिकारी सौरभ कावडे यांच्या कार्यपद्धतीवर कर्मचारी व नागरिक संतापून आहे सध्या या नगरपालिकेच्या नाकते प्रशासनाला नागरिक विविध समस्याला तोंड देत असून जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
सागर झोरे साहसिक न्यूज -24