वणा नदीवर ६० कोटीच्या नवीन बंधाऱ्याची मंजुरी..
आ. कुणावार यांचे पाठपुराव्यामुळे शहराचा पाणी प्रश्न सुटणार!
हिंगणघाट : १ डीसेंबर शहरातील वणा नदीवर ६० कोटीचा नवीन बंधारा आमदार समीर कुणावार यांच्या प्रयत्नाने मंजूर झाला असून आता हिंगणघाट शहराचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.
यासोबतच वर्धा जिल्ह्यातील शेतकर् यांचे शेतीपंपाला दिवसा १२ तास विज पुरवठा करण्यात यावा, ही आपली उर्जा मंत्र्यांकडे केलेली मागणीही मंजुर झाली असल्याचा दावा आ.समिर कुणावार यांनी आज त्यांचे निवासस्थानी आयोजीत पत्रपरिषदेतुन केला.
स्थानिक नगरपालिका क्षेत्रासाठी गेल्या २० वर्षापासुन वणा नदीपात्रात पाणी साठविण्याचा विषय अत्यंत महत्वाचा व प्रलंबित होता. वणा नदीवर बंधारा नसल्यामुळे हिंगणघाट शहरातील पाणीपुरवठ्याला मोठ्या प्रमाणावर बाधा येत होती व शहरामध्ये पाण्याची टंचाई भासत होती. हिंगणघाट मध्ये अमृत योजना आपल्याला मिळाली.अमृत योजनेच्या माध्यमातुन ११ पाण्याच्या टाक्या व २४० कि.मी. ची पाईप लाईन झाली. पण नदीमध्ये पाणी साठा पुरेश्या प्रमाणात असणेही अत्यंत गरजेचे होते.यासाठी शासनाकडे सतत आपण पाठपुरावा सुरु ठेवला होता असे आ.कुणावार यांनी सांगीतले . हिंगणघाट मध्ये हा बंधारा व्हावा यासाठी त्याचा प्रस्ताव तयार करुन शासनाकडे दिला. त्याला मागच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये केराची टोपली दाखवली गेली.तो प्रस्ताव मंजूर केल्या गेला नाही. आता नविन सरकार आल्याच्या नंतर या संदर्भात आपण दोनदा लक्षवेधी टाकली आणि मार्च महिन्यामध्ये जी लक्षवेधी आपण उपस्थित केली त्या लक्षवेधीच्या अनुषंगाने त्याची दखल घेत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या संदर्भामध्ये तातडीने त्यांच्या दालनामध्ये अधिवेशन काळात सर्व अधिका-यांची मिटींग घेतली आणि मिटींग मध्ये सर्व अधिका-यांना सुचना दिल्या असेही आ.कुणावार म्हणाले.आपल्या या प्रयत्नामुळेच सरकारने या बंधार्या संदर्भात निधी देण्याचे मंजूर केले आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ५८ कोटी ५९ लाख म्हणजेच जवळपास ६० कोटी रुपयांच्या बंधा-यासाठी राज्य शासनाचा ३० नोव्हेंबरला जि.आर मंजुर झाला.हा आपण केलेल्या सततच्या पाठपुराव्याला मिळालेले यश असल्याचे आ.कुणावार म्हणाले. हिंगणघाट शहरासाठी हा अतिशय क्रांतिकारी आणि सोनेरी दिवस आहे असे म्हणायला हरकत नाही असेही ते म्हणाले.आता वणा नदीवरील हा बंधारा पुर्ण होईल आणि बंधारा पुर्ण झाल्यामुळे हिंगणघाट शहरातील भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. हिंगणघाट शहरातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या टाक्या पुर्ण झाल्या पाईप लाईन पुर्ण झाली व कनेक्शनचे पण काम अंतिम टप्यात असल्याने हा बंधारा बांधुन पुर्ण झाल्यानंतर हिंगणघाट शहरातील अनेक भागामध्ये लोकांना २४ तास पिण्याच पाणी मिळावे यासाठी सुध्दा मी प्रयत्न करणार आहे आणि माझ्या कार्यक्षेत्रातल हे सर्वात मोठे काम असल्याचेही कुणावार म्हणाले.सध्या हिंगणघाट शहरात असलेल्या ११ पैकी ६ टाक्या सुरु झाल्या असुन तिन महिण्यात या बंधार्याची निविदा प्रक्रिया पुर्ण होउन लवकरात लवकर हे काम पुर्ण हौइल असा आशावादही कुणावार यांनी व्यक्त केला.तसेच शेतीपंपासाठी दिवसा १२ तास विज या महत्वपुर्ण विषयाकडे वळतांना हिंगणघाट विधानसभा मतदार संघात तसेच वर्धा जिल्हयातील शेतक-यांना दिवसा ८ ते १२ तास विद्युत पुरवठा मिळावा याकरिता उपमुख्यमंत्री तथा राज्याचे उर्जामंत्री देवेन्द्र फडणवीस तसेच वर्धा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व महावितरणचे अतिरिक्त संचालक विश्वास पाठक यांच्याकडे सतत याबाबत पाठपुरावा सुरु होता. दिनांक १८ नोव्हेंबर रोजी वर्धा येथे झालेल्या आढावा बैठकीत शेतक-यांना दिवसा ८ ते १२ तास कृषि विद्युत पुरवठा देण्यात यावा याबाबत चे आग्रही मत मांडुन पत्र दिले. तसेच उपमुख्यमंत्री व पालकमंत्री फडनविस यांच्याशी दुरध्वनीव्दारे चर्चाकरुन दिवसा विद्युत पुरवठा देण्याबाबत चर्चा केली होती. त्याची फलश्रुती म्हणुन दिनांक २८ नोव्हेंबरला शेतक-यांना दिवसा कृषिपंप विज पुरवठा देण्याचे ठरले असुन दिनांक २९ पासुन सर्व शेतक-यांना विद्युत पुरवठा सुरु झालेला आहे असेही प्रतिपादन आ.कुणावार यांनी केले.
या वेळी भाजपा जिल्हा महामंत्री आकाश पोहाणे,शहर अध्यक्ष भुषण पिसे व माजी जि.प.अध्यक्ष नितिन मडावी यांची उपस्थिती होती.
शासकिय वैद्यकिय महाविद्यालयासाठी विधान भवनाच्या पायर्यावर धरणे देऊ.
शासकिय वैद्यकिय महाविद्यालय हिंगणघाट येथेच देण्यात यावे,या मागणीसाठी आपण येत्या हिवाळी अधिवेशनात विधान भवनच्या पायर्यांवर धरणे देण्याची माझी तयारी केलेली आहे असे प्रतिपादन आ.समिर कुणावार यांनी केले.
वैद्यकिय महाविद्यालयाचे मागणी करीता मी सुरुवातीपासुनच आग्रही आहे, माझ्या पाठपुराव्यामुळेच आजपर्यंत जिल्ह्यातील वैद्यकिय महाविद्यालयाची जागा ठरलेली नाही.
मी मुंबई येथील मागील पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी लावली त्यामुळेच शासनाला जागेसंदर्भात निर्णय घेण्यासाठी उप समिती निर्माण करावी लागली.
आता येत्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आपण राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणविस तसेच शासनाकडे नव्याने होऊ घातलेले शासकिय वैद्यकिय महाविद्यालय हिंगणघाट येथे सुरू करण्यासाठी मागणी लावून धरू,असा निर्धार व्यक्त करतांनाच आ.कुणावार यांनी त्यासाठी वेळप्रसंगी विधानभवनाच्या पायर्यांवर ठाण मांडुन आंदोलन करण्याची तयारी दर्शविली.ईकबाल पहेलवान साहसिक न्यूज -24