पळसगाव (बाई) येथे व्यायाम शाळेचा भूमिपूजन सोहळा संपन्न.

0

स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे विकासाचं रथ-खासदार रामदास तडस

सिंदी (रेल्वे) : ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे विकासाचे रथ आहे. त्या विकासाच्या रथाचे एक चाक म्हणजे जनतेने निवडून दिलेले ग्रामपंचायतचे सदस्य आहेत. दुसरं चाक ग्रामविकास अधिकारी तर तिसरे म्हणजे सरपंच हा रथाचा सारथी असतो. या विकासाच्या रथाचे दोन्ही चाक व सारथी बरोबर असले तरच गावाचा विकास होतो. यामध्ये सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचे थोडेफार काही वैचारिक मतभेद असतात परंतु, गावाच्या विकासासाठी सर्व मतभेद विसरून सरपंच, उपसरपंच तसेच सदस्यांनी एकत्रित येऊन गावाच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजे. असे मत कार्यक्रमाचे उद्घाटक वर्धा लोकसभा खासदार रामदास तडस यांनी पळसगाव (बाई) येथे व्यायाम शाळेचे भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले.नजीकच्या पळसगाव (बाई) येथे खासदार निधी अंतर्गत व्यायाम शाळा बांधकाम प्राकलन किंमत 5 लक्ष रुपये किंमतीचे भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक 3 डिसेंबर रोजी संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून वर्धा लोकसभा खासदार रामदास तडस, प्रमुख पाहुणे साहसिक जनशक्ती संघटनेचे संस्थापक तसेच साहसिक संपादक रवींद्र कोटंबकर, जयंत गोमासे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच धीरज लेंढे, उपसरपंच शारदा बोरकुटे, तालुका प्रभारी किसान अधिकार अभियान गजानन गिरडे, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मी इरपाची, दिलीप घुगरे, गजानन धाबडधुस्के, राजू भट, पुष्पा बोरकुटे प्रामुख्याने हजर होते.पळसगाव (बाई) येथे विकासकामे करतांना सरपंच धीरज लेंढे यांनी ग्रामपंचायत सदस्यांना तसेच जनतेला विश्वासात न घेता हेकेखोर पद्धतीने सर्वे नंबर 184 वर उभारण्यात येणारी व्यायाम शाळा गावात दुसऱ्या ठिकाणी वळविली. तसेच सरपंच लेंढे यांनी केलेल्या गैरव्यवहाराबाबत ग्रामपंचायत सदस्य तसेच गावकऱ्यांनी संबंधित विभागाला 28 तक्रारी केल्या होत्या. परंतु, त्या तक्रारींची साधी चौकशी न झाल्याने उपसरपंच शारदा बोरकुटे व इतर चार सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा येथे गतवर्षी 3 ऑक्टोबर 2022 रोजी आमरण उपोषण केले होते. त्या उपोषणाची दखल घेत खासदार रामदास तडस यांनी गावात एक व्यायाम दिली असतांना दुसऱ्या व्यायाम शाळेसाठी 5 लक्ष रुपयांच्या निधीचे पत्र देऊन उपोषण सोडविले होते. त्याच व्यायाम शाळेचे भूमिपूजन सोहळा रविवारी मोठ्या थाटात संपन्न झाला.या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी सुभाष डायगव्हाणे, गंगाधर कुबडे, अमोल कांबळे, शुभम वावरे, मयूर पंडित, जयंत खोडके, मनोज देवतळे, संजय भट, प्रविण बोरकुटे, चेतन वावरे, प्रमोद देवतळे, आदेश भोंघरे, रत्नाकर भट, शुभम वावरे, तसेच गावातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

दिनेश घोडमारे साहसिक न्यूज-24 सिंदी रेल्वे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!