19 वा स्व. बाबासाहेब टालाटुले स्मृतिदिन संपन्न.

0

समर्पित भावनेने केलेले कार्य पूर्णत्वास जाते – संजय   जोगळेकर

सिंदी (रेल्वे) : ‘आपल्या आयुष्यात कोणत्या कार्यात यश किंवा अपयश आले, याचा विचार न करता केवळ चालत रहा. यशाच्या प्राप्तीसाठी मेहनत करण्याची तयारी हवीच, पण त्याचबरोबर समर्पण आणि त्यागाची भावना आवश्यक असते तरच कोणतेही कार्य पूर्णत्वास जाते’ असे प्रतिपादन समाजसेवक संजय जोगळेकर यांनी नगर शिक्षण मंडळाद्वारा आयोजित 19 व्या स्व. बाबासाहेब टालाटुले स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष नगर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अतुल टालाटुले, कोषाध्यक्ष अशोक दवंडे, संचालिका राधिका देशपांडे, प्राचार्य विलास येखंडे व पर्यवेक्षक अनिल चांदेकर प्रामुख्याने उपस्थित होते.
स्व. बाबासाहेब टालाटुले स्मृती प्रित्यर्थ ‘कोण बनेगा जिओग्राफर 2023’ चे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत आकाश बुरूटे प्रथम तर त्रुज्या वाटकर व समृद्धी दाते यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला. याप्रसंगी अध्यापिका वर्षा गवारले यांना शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात रोव्हर लीडर प्रा रवींद्र गुजरकर, गाईड कॅप्टन पुष्पा नंदनवार व स्काऊट मास्टर संजय ढगे यांच्या मार्गदर्शनात स्काऊट-गाईड, रोव्हर -रेंजर च्या मानवंदनेने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोषाध्यक्ष अशोक दवंडे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन डॉ. सतीश थेरे व आभार प्रदर्शन प्राचार्य विलास एखंडे यांनी केले.

दिनेश घोडमारे साहसिक न्यूज-24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!