सेलूत आमदार रोहित पवार यांचे शिवसेनेच्या वतीने जंगी स्वागत.
सिंदी (रेल्वे) : युवा संघर्ष यात्रा आज सेलू तालुक्यातून जात असताना शिवसेना सेलू तालुक्याच्या वतीने येथील विकास चौक येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांना शाल व श्रीफळ देऊन त्यांच्या युवा संघर्ष यात्रेचे स्वागत करण्यात आले.यावेळी प्रामुख्याने शिवसेना वर्धा जिल्हा सल्लागार अनिल देवतारे, जिल्हाप्रमुख बालू मिरापूरकर, उपजिल्हा प्रमुख सुनील पारसे, सेलू नगरपंचायतच्या नगराध्यक्ष स्नेहल देवतारे, तालुका प्रमुख अमर गूंधी, तालुका समन्वयक योगेश इखार, सेलू शहर प्रमुख प्रशांत झाडे, उपशहर प्रमुख पिंटू पराते, तालुका संघटक राजेंद्र दंढारे, अमित बाचले, तालुका कार्यालय अध्यक्ष कल्मेश लटारे, रशीद शेख, अतुल काकडे, अजित ईरपाते, विक्की पवार, राजू शेख, गणेश कंडे, गजानन पांडे, विकास टावाडे, मोहन विष्णपुर, प्रज्वल लटारे, आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिनेश घोडमारे साहसिक न्यूज-24