अखेर रामनगर वॉर्डचा मुख्य रस्त्यावर लागले स्पीड ब्रेकर.
सामाजिक कार्यकर्ते विकी वाघमारे यांच्या प्रयत्नांना यश.
हिंगणघाट : शहरातील रामनगर वार्ड मध्ये दत्त मंदिर ते सम्यक बुद्ध विहार या रोड वर स्पीड ब्रेकर लागावे
अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विकी वाघमारे यांनी प्रशासनाकडे वारंवार केली होती,या रोडवर स्पीड ब्रेकर लागावे अशी रामनगर वॉर्डातील नागरिकांची मागणी होती हिच समस्या मार्गी लागावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते विकी वाघमारे सतत प्रयत्न करीत होते.
रामनगर वॉर्ड सम्यक बुद्ध विहार समोरील रोड ते दत्त मंदिर कडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहतुकीसाठी या मुख्य रसत्यावरून भरधाव वाहनांना आळा बसावा व वाहनांची गाडीची स्पीड नियंत्रणात राहावी यासाठी स्पीड ब्रेकर (गतिरोधक) लावण्यात यावे अशी मागणी रामनगर वॉर्डातील नागरिकांची होती,हिच मागणी सामाजिक कार्यकर्ते विकी वाघमारे यांनी नगरपालिका प्रशासना कडे वारंवार करत होते.
रामनगर वॉर्ड पासून दत्त मंदिर कडे येण्याजाण्यासाठी मुख्य रस्ता आहे,मोठ्या प्रमाणात लहान व मोठ्या गाड्याची वाहतूक मोठ्या प्रमाणात राहते,या रोडवर बरेच दा मोठ्या प्रमाणात अपघात सुद्धा झाले आहे.
भविष्यात वाढत्या वाहनाच्या गतीमुळे मोठीजीवित हानी होणार तर नाही अशी भीती नागरिकांमध्ये मध्ये निर्माण झाली होती,परंतु स्थानिकांचे गांभीर्य लक्षात घेत सामाजिक कार्यकर्ते विकी वाघमारे यांनी
कृ.उ बाजार समितीचे सभापती ॲड.सुधीर कोठारी यांच्या मार्गदर्शनात प्रशासनांना पाठपुरावा करीत व प्रशासनाच्या संपर्कात राहून कामाला दुजोरा दिला व आज स्वतः उपस्थित राहून स्पीड ब्रेकर (गतिरोधक) लावण्यात आले.
वॉर्डातील नागीरकांनी माज्यावर विश्वास ठेवला व तोच विश्वास ठेवत मी सतत प्रयत्न करीत होतो मागील बऱ्याच दिवसापासुन रामनगर वॉर्ड मार्गातील सम्यक बुद्ध विहाराच्या समोरील रस्त्यावर स्पीड ब्रेकर (गतिरोधक) लावण्यात यावे अशी मागणी नागरिकांची होती,हिच मागणी मी रेटून धरली होती, अधिकाऱ्यांसोबत सतत पाठपुरावा करीत राहत होतो,स्पीड ब्रेकर (गतिरोधक) नसल्यामुळे वार्डातील नागरिकांना अपघाताची भीती निर्माण झाले होते परंतू वार्डातील नागरिकानां त्रास होता कामा नये हेच डोळ्यासमोर होते व स्पीड ब्रेकर (गतीरोधक) अखेर काल स्वतः उपस्थित राहून या कामाला पूर्ण विराम दिले.
ईकबाल पहेलवान साहसिक न्यूज-24 हिंगणघाट