शेतकऱ्याचे शेतामधून कापसाची चोरी.
हिंगणघाट : तालुक्यातील वडनेर येथील उद्योजक तथा सधन शेतकरी भोजराज विठ्ठलराव कामडी यांच्या आजनसरा रस्त्यावरील शेतातील गोडावून मधून एकूण वीस क्विंटल कापसाची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना उघडकीस आली.सदर प्रकरणी वडनेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून बाजार भावानुसार या कापसाची किंमत १ लाख ४० हजार रुपये आहे.सदर घटना येथील उद्योजक भोजराज विठ्ठलराव कामडी यांचेशेत सर्वे नंबर ५५९/१ येथे घडली.कामडी यांचे शेतामध्ये ४ हजार फुटाचे मोठे गोडाऊन आहे, या ठिकाणी त्यांनी जवळ्पास २०० क्विंटल कापूस ठेवला होता.चोरटयांनी या गोडावूनमधून शटर तोडून चोरट्यांनी काल रात्रीच्या सुमारास जवळपास वीस क्विंटल कापूस हा वाहनामध्ये टाकून लांबविला.पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर चोरट्यांचा शोध वडनेर पोलीस घेत आहे.वडनेर परिसरात अश्या बऱ्याचश्या घटना अलीकडे घडत असून या परिसरात पोलिसांचा कुठल्याही प्रकारचा वचक चोरट्यांना राहिलेला नाही.तसेच या परिसरात दारू, मटका, गुंडागर्दी वाढल्याचे दिसून येत आहे.या प्रकरणी वडनेर पोलिसांनी याप्रकरणी दखल त्वरित घ्यावी अशी मागणी शेतकरी व गावातील नागरिक करीत आहे.
ईकबाल पहेलवान साहसिक न्यूज-24 हिंगणघाट