अलफोंसा सिनियर सेकंडरी शाळेचे दोन विद्यार्थी यांची क्रीडा स्पर्धसाठी राष्ट्रीय स्तरावर निवड.
स्टेअर्स फाऊन्डेशन महाराष्ट्र राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा 23 – 24 सोलापूर येथे संपन्न .
राज्यातील 20 जिल्हयातून 1500 पेक्षा जास्त खेळाडू विविध 7 व बंदिस्त खेळात सहभागी झाले होते.
अल्फोन्सा सिनियर सेंकडरी स्कुल मधील दोन विद्यार्थी सक्षम अरविंद पाटील व स्पर्श प्रशांत ढोले यांनी फूटबॉल या खेळात सहभाग घेतला होता. त्यांनी तेथे प्रविण्य मिळविले होते.प्रा.राजेंद्र बाणमारे , महाराष्ट्र राज्य , वर्धा जिल्हा प्रमुख उमेश गायकवाड , टेनिस क्रिकेट , वर्धा जिल्हा प्रमुख यांच्या नेतृत्वात हे विद्यार्थी सोलापूर येथे गेले होते. फूटबॉल या खेळासाठी हे दोन्ही विद्यार्थी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. उपरोक्त क्रीडा स्पर्धत राष्ट्रीय स्तरावर निवड झाल्यामुळे ही बाब वर्धा शहरासाठी नव्हे तर संपूर्ण जिल्हसाठी गौरवाची आहे. या शाळेचे नाव भारताचे नकाशावर आणले आहे. शाळेच्या प्रिन्सिपॉल नव्या मॅडम तसेच शाळेचे क्रीडा शिक्षण देणारे संदीप खेर सर, वर्गशिक्षका सुनंदा मॅडम शिक्षक व शिक्षकेतर यांनी अभिनंदन केले ,प्रा. अरविंद पाटील सर, शुभांगी अरविंद पाटील प्रशांत ढोले, पद्मा प्रशांत ढोले यांनी विद्यार्थी यांचे अभिनंदन केले आहे.
सागर झोरे साहसिक न्यूज-24